coronavirus: कनिका कपूरला अखेर हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, मात्र या अटीवर...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

कनिकाच्या एकानंतर एक अशा चार कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने तिचं कुटुंब काळजीत होतं..मात्र आता कनिकाबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे..रिपोर्ट्सनुसार कनिकाला एका अटीवर हॉस्पिटलने सुट्टी दिली आहे

मुंबई- बॉलीवूड गायिका कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती..९ मार्चला कनिका लंडनवरुन मुंबईला आली होती त्यानंतर दोन दिवस ती लखनऊला गेली आणि तिथे पार्टीमध्ये सहभागी झाली...त्यामुळे कनिकाच्या या हलगर्जीपणामुळे तिच्यावर उत्तर प्रदेशमध्ये FIR दाखल केली गेली..कनिका लखनऊमध्ये संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये कोरोनावर उपचार घेत होती....कनिकाच्या एकानंतर एक अशा चार कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने तिचं कुटुंब काळजीत होतं..मात्र आता कनिकाबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे..

हे ही वाचा: बॉलीवूडकरांचा पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद, दिवे लावून शेअर केले फोटो

कनिकाची सहावी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे..याचा अर्थ आता कनिकाला कोरोनाबाधित नाहीये..कनिकाच्या सलग चार टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आता कनिकाच्या पाचव्या आणि सहाव्या टेस्टचा रिपोर्ट समोर आला असून दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत..कनिकाच्या सगळ्या टेस्ट करुन झाल्यानंतरच तिला सोमवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे..

कनिकाचा सहावा रिपोर्ट निगेटीव्ह आला आणि त्यानंतरच तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला..मात्र असं असलं तरी कनिकाला जवळपास १४ दिवस निरिक्षणाखाली ठेवलं जाणार आहे..रिपोर्ट्सनुसार कनिकाला एका अटीवर हॉस्पिटलने सुट्टी दिली आहे आणि ती अट म्हणजे तिला १४ दिवस होम क्वारंटाईन रहायचं आहे.

Coronavirus Positive Singer Kanika Kapoor Revealed Why She Went To ...

याआधी लखनऊमधील या हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर.के.धीमान यांनी आयएएनएस या न्युज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, कनिकाचे रिपोर्ट्स आता निगेटीव्ह आले आहेत..मात्र तिला घरी जाण्याची संमती देण्याआधी तिची एक टेस्ट करणार आहोत..जर तिची दुसरी टेस्टदेखील निगेटीव्ह आली तर तिला या आठवड्यात घरी जाण्याची संमती दिली जाईल..

Kanika Kapoor's surprise moment on the sets of Om Shanti Om ...

गायिका कनिका कपूर ही बॉलीवूडची पहिली सेलिब्रिटी आहे जी या कोरोना व्हायरसमुळे बाधित झाली आहे..जगभरात कोरोनाने बाधित होणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे..भारतात आत्तापर्यंत १०९ लोकांचा यामुळे मृत्यु झाला आहे..

kanika kapoor who was found negative in the test again was discharged from the hospital  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanika kapoor who was found negative in the test again was discharged from the hospital