coronavirus: मराठी कलाकारांनी 'या' हटके पद्धतीने केलं लोकांना घरात राहण्याचं आवाहन

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Friday, 10 April 2020

मराठी इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रिटींनी एकत्र येऊन कोरोनाला हरवण्यासाठी लोकांनी घरातच राहण्याचं आवाहन करणारा एक खास मेसेज हटके पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आहे..

मुंबई- सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे सध्या अनेकांना घरातच रहावं लागत आहे. त्यामुळे त्यांचं रूटीन बदललं आहे. याचाच प्रभाव त्यांच्या मानसिक आरोग्यावर पडत आहे. अश्यातच घरात राहून अनेकांमध्ये एकटेपणाची भावना जागृत होत आहे. जर लॉकडाउन असंच पुढे सुरू राहिलं तर लोकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेत तर अनेक लोकांनी यासाठी डॉक्टरांकडे मदत मागितली आहे. पण कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सध्यातरी घरी रहाणे हा एकच पर्याय समोर आहे.

coronavirus: सेल्फ आयसोलेशनबद्दल माहिती देणारा हा आहे लघुपट..तुम्हालाही पाहायचा असेल तर मग हे वाचाच

अश्यातच लोकांच्या मनामध्ये एकटेपणाची भावना जागृत होऊ नये यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे सरसावले आहेत.. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणे, चाहत्यांसोबत अपडेट्स शेअर करणे अश्या अनेक गोष्टी करताना ते पाहायला मिळत आहेत...आणि म्हणूनच काही सेलिब्रिटींनी एकत्र येऊन एक खास मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

. . सद्य परिस्थितीचा सामना आपण सगळेच करतोय त्यामुळे स्वतःला एकटं समजू नका, आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी घरी राहा, आणि स्वतःची काळजी घ्या. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सध्यातरी घरी रहाणे हा एकच पर्याय समोर आहे. “ Stay Home.. Stay Safe “. @deepalisayed @hardeek_joshi @manasinaik0302 @devdatta.g.nage @mesandeeppathak @sanskruti_balgude_official @abhinay3 @akshayaddr @punitbalan @smitashewale2112 @bhargavi_chirmuley @kiran_gaikwad12 @jogpushkar @smita.gondkar @suyashtlk @sangramsalvi

A post shared by DEVDATTA G NAGE (@devdatta.g.nage) on

दीपाली सय्यद, हार्दिक जोशी, मानसी नाईक, देवदत्त नागे, संदीप पाठक, संस्कृती बालगुडे, अभिनय बेर्डे, अक्षया देवधर, पुनीत बालन, स्मिता शेवाळे, भार्गवी चिरमुले, किरण गायकवाड, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, सुयश टिळक, संग्राम साळवी या सेलिब्रिटींनी एकत्र येऊन एक मेसेज लोकांसाठी तयार केला आहे..या मेसेजमध्ये ते सांगतात की, सद्य परिस्थितीचा सामना आपण सगळेच करतोय त्यामुळे स्वतःला एकटं समजू नका, आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी घरी राहा, आणि स्वतःची काळजी घ्या..
हा मेसेज प्रत्येकाने त्याच्या घरात राहुन दिला आहे..

Covid-19: Big B, Priyanka and Rajinikanth's short film Family is ...

अशीच आगळी वेगळी कल्पना काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी फॅमिली या व्हिडिओमधून समोर आणली होती..आता मराठी कलाकारांनी पुढाकार घेऊन लोकांना या मेसेजद्वारे घरातंच राहण्याचं आवाहन केलं आहे..

marathi celebrities gives message to all saying stay at home  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi celebrities gives message to all saying stay at home