हॉलीवूडचे विषाणू चित्रपट प्रेम आणि आजचे आव्हान !

अभय सुपेकर, सकाळ संशोधन आणि विकास विभाग
Friday, 10 April 2020

हॉलीवूडने बनवलेले विषाणूहल्ल्याचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर गेली किमान सात दशके केवळ सुपरहिटच झाले असे नाही तर त्यांनी अनेकानेक उच्चांकही केले.

चीनमधून आलेल्या करोना विषाणूने जगात हाहाकार माजवलेला आहे. जगातील पावणे दोनशेवर देशांत कमी-अधिक प्रमाणात त्याचा शिरकाव झालाय, तर जागतिक महासत्ता अमेरिकेसह युरोपातील इटली, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांना घायकुतीला आणले आहे. मात्र, अमेरिकेतीलच हॉलीवूडने बनवलेले विषाणूहल्ल्याचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर गेली किमान सात दशके केवळ सुपरहिटच झाले असे नव्हे; तर त्यांनी अनेकानेक उच्चांकही केले. त्याचीच ही झलक -

coronavirus: सेल्फ आयसोलेशनबद्दल माहिती देणारा हा आहे लघुपट..तुम्हालाही पाहायचा असेल तर हे वाचाच

What was the point of The Seventh Seal (1957)? Why is it so highly ...

- द सेव्हन्थ सील (1957):  'इग्मर बर्गमनच्या वूड पेंटिंग' या नाटकावरून या चित्रपटाचे कथालेखन त्याने स्वतः केले आहे. प्लेगच्या साथीला मध्ययुगीन एका सरदाराने दिलेली झुंज, असे या चित्रपटाचे वर्णन करता येईल.

Dell on Movies: 3 Movies, 1 Book: I Am Legend

- द लास्ट मॅन ऑन अर्थ (1964), द ओमेगा मॅन (1971) आणि आय ऍम लिंजड (2007) : रिचर्ड मॉथरसनच्या "आय ऍम लिंजड' या कादंबरीवर आधारित या चित्रपटांत प्लेगच्या महामारीने मानवाच्या अस्तित्वावरच घाला येतो आणि त्यातून निघालेला मार्ग यावर तो बेतलेला आहे. 2007 मधील 'आय ऍम लिजंड'मध्ये फ्रान्सिस लॉरेन्सच्या या चित्रपटात त्यावेळी प्रसिद्धीच्या शिखरावरील विल स्मिथने अमेरिकी लष्करातील विषाणूतज्ज्ञाची भूमिका केली आहे. प्लेगने मोठ्या प्रमाणात नरसंहार होतो, विनाशाच्या उंबरठ्यावर असताना मार्ग सापडतो, असे दाखवले आहे.

John Kenneth Muir's Reflections on Cult Movies and Classic TV ...

- द अँड्रोमेडा स्ट्रेन (1971): मायकेल क्रिग्टनच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात अवकाशातून पृथ्वीवर आलेल्या संसर्गजन्य जिवाचा शोध शास्त्रज्ञ घेतात, त्याने माजलेला गोंधळ आणि वाचलेली मानवजात यावर चित्रण आहे.

Dawn of the Dead | Full Movie | Movies Anywhere

- डॉन ऑफ द डेड (1978-2004 मध्ये रिमेक): जागतिक महामारीचे संकट किती बिकट असते, याचे यथार्थ चित्रण यात आहे. रिमेकमध्ये झॅक सायडरची भूमिका आहे.

Self isolating because of Coronavirus? Here's 5 movies like ...

- आऊटब्रेक (1995): जर्मन चित्रपट निर्माता वुल्फगॅंग पिटरसनच्या 1995 मधील या चित्रपटात एबोलासारखा मतोबा विषाणू आफ्रिकेतील झैरेमध्ये अवतरतो, नंतर तो अमेरिकेतील खेड्यात आढळतो, असे कथानक असलेल्या या चित्रपटात डस्टीन हॉफमन, रेने रूसो, मॉर्गन फ्रीमन आहेत. यातील लष्करातील जनरलला तो विषाणू जैविक युद्धासाठी हवा असतो, त्यासाठीचा आटापिटा आणि त्याला विरोधही यात आहे.

Twelve Monkeys Movie Trailer, Reviews and More | TV Guide

- ट्‌वेल्व्ह मंकी (1995): टेरी ग्लीमच्या या वैज्ञानिक कथापटात ब्रूस विलीसची भूमिका आहे. त्याला होवून गेलेल्या जागतिक महामारीचा शोध घेण्यासाठी पाठवले जाते, असे दाखवले आहे.

Cabin Fever (2002 film) - Wikipedia

- केबिन फिव्हर (2002): एली रॉथच्या या पहिल्याच चित्रपटात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विषाणूने गाठणे आणि त्याने उडालेला कहर चित्रीत केलाय.

Contagion (2011) - IMDb

- कंटेजन (2011): स्टिव्हन सोडरबर्गच्या या चित्रपटात नव्या विषाणूने एकाचा मृत्यू होतो. त्याचा फैलाव, त्याने जगभर माजलेला गोंधळ, लस सापडण्यातील अडचणी आणि निष्क्रीय यंत्रणेमुळे भोगावे लागलेले परिणाम यांचे चित्रण आहे, जे आज जगात अनुभवले जात आहे.

28 Days Later... (2002) - IMDb

- 28 डेज लॅटर (2002) आणि त्याचाच पुढील भाग 28 विक्‍स लॅटर (2007): सिलीयन मर्फी, नोओमी हॅरीस आणि ख्रिस्तोफर एकलस्टन यांच्यावर चित्रीत या डॅनी बॉयलच्या चित्रपटात अपघाताने आजार संक्रमित पसरवणारा विषाणू बाहेर पडतो आणि त्याने माजवलेला हाहाकार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण मानवतेलाच त्याने आव्हान दिल्याचे दाखवले आहे.

- रेसिडेन्ट इव्हिल मालिका (2004 पासून): रेसिडेन्ट इव्हिल: अपोकॅलिप्सने (2004) सुरू झालेल्या मालिकेत पुढे रेसिडेन्ट इव्हिल: एक्‍सटिन्क्‍शन (2007), रेसिडेन्ट इव्हिल: आफ्टरलाईफ (2010), रेसिडेन्ट इव्हिल: रिट्रीब्युशन (2012) आणि रेसिडेन्ट इव्हिल: द फायनल चाप्टर (2016) अशा मालिकेतून माजी संरक्षण तज्ञ अलिसवर (मिला जोवोविच) बेतलेल्या या भागांमध्ये जैविक युद्धाने माणूस निर्णय घेण्याबाबत गोंधळून जातो आणि सर्वनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचतो, असे चित्रीत केले आहे.

Blindness (2008) - Photo Gallery - IMDb

- ब्लाईंडनेस (2008): पोर्तुगीज लेखक जोस सारामागो यांच्या 1995 मधील पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला असून, त्यात जुलियाने मूर, मार्क रफॅलो यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शन फर्नांडो मिरल्सचे आहे. 2001 मध्ये रफॅलोस ब्रेन ट्यूमर होतो, त्याचे निदान अकॉस्टीक न्यूरोमा असे केले जाते. त्याच्या कारणमिमांसेत जात चित्रपट पुढे सरकतो.

- ड्यूमस्‌डे (2008): मूळ बंगाली-भारतीय वंशाची रोना मित्राची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे नील मार्शलने दिग्दर्शन केले आहे. स्कॉटलंडमध्ये विषाणूचा फैलाव आणि त्याला क्वारंटाईन केले जाणे यावर कथानक बेतले आहे.

- कॅरियर्स (2009): डेव्हिड आणि अलेक्‍स पास्टर दिग्दर्शीत या चित्रपटात ख्यातनाम अभिनेत्री एमिली व्हॅनकॅम्प आणि ख्रिस पाईन यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील चार मित्र विषाणूच्या फैलावाने निर्मित जागतिक महामारीतून वाचण्यासाठी करत असलेली धडपड चित्रीत केली आहे.

Homemade Lemon Cake: World War Z (2013)

- वर्ल्ड वॉर झेड (2013): महामारीवरील या चित्रपटाची निर्मिती आणि प्रमुख भूमिका ब्रॅड पीटची आहे.

Maggie (2015) | Movie and TV Wiki | Fandom

- मॅगी (2015): टर्मिनेटरफेम ऍक्‍शनस्टार अर्नाल्ड श्‍वार्त्झेनेगरची प्रमुख असलेल्या या चित्रपटात नेहमी शत्रूशी बंदूक, मशीनगनने दोन हात करणारा श्‍वार्त्झेनेगर बंदुकीशिवाय लढा देताना दिसतो. त्याला ही भूमिकाही खूप भावली होती.

Pandemic (2016)

- पॅंडेमिक (2016): महामारीने जग त्रस्त असताना, त्यावर तोडगा काढण्यासाठी झटणारा हिरो यात दाखवला आहे. यात रिचेल निकोलसने डॉक्‍टरची भूमिका केली आहे.

see how hollywood handles deadly viruses like corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: see how hollywood handles deadly viruses like corona