coronavirus: शाहरुख खानचा 'हा' जवळचा मित्र आणि निर्माता तणावाखाली,मुलीला झाली कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

एकीकडे गायिका कनिका कपूरला आता डिस्चार्ज मिळून ती घरी परतली आहे तर दुसरीकडे बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलीला आता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय..

मुंबई- कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे..एकीकडे गायिका कनिका कपूरला आता डिस्चार्ज मिळून ती घरी परतली आहे तर दुसरीकडे बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलीला आता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय..

Film Producer Karim Morani Daughter Shaza Corona Positive also ...

कनिका नंतर आता 'चेन्नई एक्सप्रेस'चे निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं कळतंय..

शजा मोरानीला सध्या मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलंय..तर तिच्या कुटुंबियांना क्वारंटाईन केलं गेलं आहे आणि लवकरंच या सगळ्यांचीसुद्धा टेस्ट केली जाण्याची शक्यता आहे..शाहरुख खानचे जवळचे मानले जाणारे करिम मोरानी सध्या खुप तणावाखाली आहेत..

हे ही वाचा: 'मी घाबरलो आहे' असं म्हणत सलमान खानने शेअर केला भावूक व्हिडिओ

करिम त्यांच्या संपूर्ण  कुटुंबासोबत मुंबईतील जुहू या ठिकाणी राहतात..तुम्हाला माहित असेल तर जुहु या ठिकाणी अनेक सेलिब्रिटींची घरे आहेत.आत्तापर्यंत मुंबईमध्ये जरी अनेक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या समोर आली असली तरी जुहूमधील ही पहिलीच केस असल्याचं कळतंय..या बातमीनंतर त्या संपूर्ण भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे..शजा रविवारी संध्याकाळी कोरोनो पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं होतं..तिला मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे..शजा तिच्या आई-वडिल आणि बहिण जोया मोरानीसोबत राहते..

Chennai Express producer Karim Morani's daughter Shaza Morani ...

प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बिल्डिंगला लॉकडाऊन केलं आहे..शजाच्या घरातील ९ सदस्यांची देखील कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे..मोरानी कुटुंब राहत असलेल्या जुहुमधील बिल्डिंगचं नाव 'शगुन' आहे..

MeToo: How can SRK work with Karim Morani, questions 21-year-old ...

जुहुमध्ये पहिला कोरोना पॉझिटीव्ह-

'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमाचे निर्माते करीम मोरानी शाहरुखचे अत्यंत जवळचे मानले जातात..एवढंच नाही तर बॉलीवूडच्या अनेक मोठ्या पार्ट्या आयोजित करण्यांमध्ये मोरानी कुटुंबाचा हात असतो...

विशेष म्हणजे जुहूमध्ये कोरोना पॉझिटीव्ह सापडणं यासाठी चिंतेची बाब आहे कारण अमिताभ बच्चन, हृतिक रोशन यांसारखे अनेक मोठे सेलिब्रिटी इथे राहतात...

shah rukh khans film producer karim morani daughter shaza morani tested postive for coronavirus  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shah rukh khans film producer karim morani daughter shaza morani tested postive for coronavirus