coronavirus : मुळशीतील पाच जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

जमावबंदी झुगारून तसेच  तोंडाला  मास्क न लावता एकत्र येऊन  गर्दी   केल्याच्या कारणावरून पौड पोलिसांनी बोतरवाडी (ता.मुळशी) येथील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पिरंगुट - जमावबंदी झुगारून तसेच  तोंडाला  मास्क न लावता एकत्र येऊन  गर्दी   केल्याच्या कारणावरून पौड पोलिसांनी बोतरवाडी (ता.मुळशी) येथील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल लवटे, वाहतूक पोलीस मयुर निंबाळकर, मगर यांचे  पथक काल बुधवार दिनांक २५ रोजी नेहमीप्रमाणे उरावडे परिसरात गस्त घालीत होते. रात्री सात वाजण्याच्या सुमारास बोतरवडी येथील एका पारावरच्या कट्ट्यावर गावातील काही तरुण एकत्र येवुन  गप्पा मारीत होती. त्यांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती कायदा व  महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर मुळशीतील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. नागरिकांनी संयम राखून  या राष्ट्रीय आपत्ती काळात सर्व प्रकारच्या प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 people crime in mulshi in curfew