Coronavirus : संचारबंदी अन् लाॅकडाऊन असले तरी मशागतीच्या कामाला वेग आला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

संचारबंदी अन् लाॅकडाऊन असले तरी, शेतावर मशागतीच्या कामाला बाहेर पडावं लागतंय. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात भात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यातील भात हे मुख्य पिक आहे, पेरणीसाठी आता राब भाजायला सुरूवात झाली आहे. पालापाचोळा आणि शेणाच्या गोव-या जाळून राब भाजण्याची ही पारंपरिक पद्धत आहे.

कामशेत - संचारबंदी अन् लाॅकडाऊन असले तरी, शेतावर मशागतीच्या कामाला बाहेर पडावं लागतंय. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात भात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यातील भात हे मुख्य पिक आहे, पेरणीसाठी आता राब भाजायला सुरूवात झाली आहे. पालापाचोळा आणि शेणाच्या गोव-या जाळून राब भाजण्याची ही पारंपरिक पद्धत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाताची पेरणी केल्यावर रोपात तण उगवून वाढू नये हा त्यातील मुख्य हेतू आहे. अक्षय्य तृतियाच्या मुहूर्तावर भात पेरणीची परंपरा आता कमी झाली असून मृग नक्षत्रात करावयाच्या पेरणीसाठीची मशागत सुरू आहे. भात खाचरात बैलजोडीच्या मदतीने किंवा टॅक्टरच्या सहाय्याने रोपटे करून त्यावर राब भाजले जातात. 

साधारणपणे एप्रिल मेच्या रणरणत्या उन्हात भात पेरणीपूर्व मशागत केली जात आहे.
शेताच्या बांधाची दुरूस्ती, पावसाळ्यात पडलेल्या शेताच्या नाल्याची दुरूस्ती याच महिन्यात होते. इतकेच काय वावरात शेण खत आणि उकिरडयावरील खत टाकण्याच्या कामे ही बळीराजा करीत आहेत. काही शेतकरी उन्हाळ्यात पेरलेल्या बाजरीची राखण करीत आहेत. तर काही जणांनी यंदाच्या हंगामात चांगले लग्न सराईत चांगले उत्पन्न मिळेल या हेतूने लावलेल्या काकडी, परसबी, खरबूजाच्या काढणीत मग्न आहेत. 

नाथा शेलार म्हणाले, शासनाने दिलेल्या लाॅकडाऊन आणि संचारबंदीच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. या आदेशाचे पालन करतानाच शेतीच्या मशागतीची कामे आम्ही करीत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture work speed start in curfew and lockdown