#Lockdown2.0 : कोरोना लाॅकडाऊनचा आणखी एक तळेगाव पॅटर्न 

गणेश बोरुडे
Friday, 17 April 2020

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्सींगसह संपुर्ण लाॅकडाऊनचा आदर्श राज्याला घालून देणार्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि पोलिसांनी कमी मनुष्यबळात नागरिकांचा वावर थांबवण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे.मुख्य मारुती चौकाकडे येणारे सर्व अंतर्गत रस्ते बंद करुन एकच रस्ता ये जा करण्यासाठी ठेवला आहे.

अख्ख्या गावासाठी रहदारीचा आता एकच मार्ग !
तळेगाव स्टेशन - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्सींगसह संपुर्ण लाॅकडाऊनचा आदर्श राज्याला घालून देणार्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि पोलिसांनी कमी मनुष्यबळात नागरिकांचा वावर थांबवण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे.मुख्य मारुती चौकाकडे येणारे सर्व अंतर्गत रस्ते बंद करुन एकच रस्ता ये जा करण्यासाठी ठेवला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तळेगावातून आतबाहेर येण्यासाठी जिजामाता चौकातील तुळजाभावानी मंदिरासमोरुन जाणारा केवळ एकच रस्ता अत्यावश्यक कामासाठी ये जा करण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तळेगावातील कडोलकर काॅलनी, संभाजीनगर, बाजारपेठ, राजेंद्र चौक, जयशंकर काॅर्नर आदी भागांकडून मारुती मंदिर चौकाकडे येणारे अंतर्गत रहदारीचे सर्व महत्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. पक्के बांबू, शेडनेट आणि बॅरीकेडस आडवे लावून बंद केलेल्या या रस्त्यावरुन साधी दुचाकी सुद्धा येऊ शकणार नाही.त्यामुळे आता केवळ लिंब फाटा, मारुती मंदिर आणि स्टेशन चौक या तीन ठिकाणीच पोलिसांनी नाकेबंदी ठेवली आहे. तळेगावातून कुठेही ये जा करणार्या आत बाहेरील नागरिकांना मारुती मंदिर चौकातून जाण्याशिवाय पर्यायच नसल्यामुळे मोकाट फिरणार्यांवर चांगले नियंत्रण प्रस्थापित होऊ शकेल असा विश्वास मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी व्यक्त केला. तसेच यामुळे मनुष्यबळ कमी लागणार असून ते इतर महत्वाच्या ठिकाणांसाठी वापरता येईल असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले. रहदारी नियंत्रणाचा हा तळेगाव पॅटर्न सगळीकडे राबवण्याची गरज आहे.

दुसरीकडे तळेगाव स्टेशन परिसरात बाहेरुन येणारा एकमेव कातवी रस्ता चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. चाकण महामार्गावरील पोस्ट ऑफिस आणि मराठा क्रांती चौकात लाॅकडाऊन दरम्यान फारसा पोलिस बंदोबस्त दिसलेला नाही.त्यामुळे इकडे काहीसा मुक्त संचार पहायला मिळतो. लोकसंख्येची घनता तुलनेने अधिक असूनही स्टेशन विभागाकडे मात्र तळेगाव आणि एमआयडीसी दोन्ही ठाण्याच्या पोलिसांचे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष होत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another Talegaon pattern from Corona Lockdown