खासगी दवाखाने सुरू ठेवा; विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवाहन 

clinic
clinic

पुणे - शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सद्यःस्थितीत आपले दवाखाने सुरू ठेवावेत. तसेच रुग्णांना सर्दी, खोकला व घसादुखी या आजारांची लक्षणे असल्यास त्यांना कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी येथील रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाने केले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये पालिकेच्या किंवा इतर खासगी दवाखान्यांमध्ये कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळल्यास त्याला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) किंवा भोसरी येथील रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येतील. यासाठी ०२०-६७३३१३०७ या क्रमांकावर संपर्क करा. तसेच, पुणे शहरासाठी ०२०-२५८१८३२३ व डॉ. स्वाती बढीये (निवासी वैद्यकीय अधिकारी, बोपोडी) ८८०६६६८७४७ यावर संपर्क करा. 

कामागारांसाठी कॅम्प 
स्थलांतरित कामगारांसाठी पुणे विभागात जिल्हा प्रशासनाकडून ९७ आणि साखर कारखान्यांमार्फत ४४६ असे एकूण ५४३ कॅम्प उभारले आहेत. यामध्ये २६ हजार ४७२ स्थलांरित कामगार असून, एकूण ८५ हजार १४८ कामगारांना जेवण देण्यात येत आहे. 

‘बाजार समित्यांना पोलिस बंदोबस्त द्या’ 
कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू राहण्यासाठी पोलिस विभागाकडून डिजिटल पास मिळेपर्यंत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आडते व कामगार यांना दिलेल्या ओळखपत्रांनुसार प्रवेश द्यावा. तसेच, बाजार समितीस पोलिस बंदोबस्त द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी पोलिस विभागास केल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com