Lockdown : संचारबंदी असतानाही धार्मिक ठिकाणी राहणाऱ्या १३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

रांची येथील 13 जणांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 नुसार तसेच साथीचा रोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोवीड 19 अंमलबजावणी कायदा कलम 21 यानुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : संचारबंदी लागण्यापूर्वी शहरात आलेल्या, मात्र माघारी जाता न आलेले १३ जण फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणी रहात होते. संबंधित धार्मिक स्थळ व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळे १३ जणां विरूद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
येथील 13 जणांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 नुसार तसेच साथीचा रोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोवीड 19 अंमलबजावणी कायदा कलम 21 यानुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका धार्मिक ठिकाणावरून नागरिकांचा आवाज पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तेथे १३ जण धार्मिक कार्यक्रम पार पाडत होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा ते बिहार राज्यतील रांची येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून नायडू रुग्णालयात नेले. त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली, मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

सर्व व्यक्ती संचारबंदी पूर्वी शहरात आले होते, नियमानुसार त्यांनी शहरात आल्यानंतर आपली माहिती पोलिसाना देणे बंधनकारक होते. परंतु त्यांनी पोलिसांना अशी कोणतीच माहिती न देता येथील मध्यवस्तीत एका धार्मिक ठिकाणी वास्तव्य करीत होते. त्यांच्याविषयी खबर मिळाल्यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against 13 people who living in religious place during curfew