सोशल मीडियावरील चॅलेंज महागात

Social-Media
Social-Media

व्हॉट्‌सॲप, फेसबुकवरील फोटोंचा गैरवापर होण्याची शक्‍यता
पिंपरी - सध्या सोशल मीडियावर हौशी महिलांनी बेस्ट फ्रेंड, बेस्ट साडी पिक्‍स चॅलेंज, बेस्ट कपल फोटो चॅलेंज अशा विविध टॅगलाइनखाली फोटो शेअर करून व्हॉट्‌सॲप, फेसबुकवर लाइक, कमेंटचा धुमाकूळ घातला आहे. लॉकडाउनमध्ये करायचं काय, हा प्रश्‍न अनेकींना सतावत असल्याने महिलांनी अतिउत्साहाने सोशल मीडियावर फोटो अपलोड केले आहेत. मात्र, विविध लूकमधील हे फोटोच मॉर्फिंगसाठी (संगणकावर बदल) टार्गेट होत असल्याने सायबर चोरट्यांना संधी चालून आली आहे. 

पोलिसांनी याबाबत नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामध्ये असे नमूद केले आहे की, ‘महिलांच्या फोटोंचे सायबर चोरटे गैरवापर करून मॉर्फिंग करीत आहेत. सर्व महिला व पुरुष घरात रिकामा वेळ असल्याने लॉकडाउन कालावधीत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. नेमका याचाच गैरफायदा सायबर हॅकर्सनी घेतला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे टास्क तयार करून युजर्सला आकर्षित केले जात आहे. त्यापासून सावध राहा.’

याविषयी मनीषा म्हणाली, ‘‘प्रत्येकाने एकमेंकाना फोटो शेअर करायचे व ते व्हॉट्‌सॲप व फेसबुक स्टेटसला टाकायचे. ही फॅशन झाली आहे. त्यातून महिलांचे मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो शेअर केले जाऊ शकतात. त्यांची बदनामी करून ब्लॅकमेलिंग होऊ शकते. यासाठी मी वैयक्तिक अथवा कौटुंबिक कोणतेही फोटो शेअर करताना काळजी घेते. सेटिंग पाहते. गरज असेल तरच शेअर करते. लाइक व कमेंटला बळी पडत नाही. त्यापेक्षा मी वैचारिक लिखाण करण्याचा प्रयत्न करते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com