Corona Virus : पुणेकरांनो, तुम्हाला प्रश्न, शंका आहेत? मग, विचारा पुणे पोलिसांना तेही व्हॉट्सअपवर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

सर्वसामान्य नागरीकांना कलम 144, संचारबंदी, वाहतुक बंदी याबाबत अनेक प्रश्न, शंका व त्यांना अडचणी येत आहेत. त्यावर नेमके कोण अधिकृत उत्तर देऊ शकेल, असा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात होता. पुणे पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन नागरीकांच्या प्रश्न व शंकाचे निरसन करण्याचे ठरविले आहे.

पोलि

पुणे : तुम्हाला कलम 144 बद्दल प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला पोलिसांनी घेतलेल्या वाहतुक बंदीच्या निर्णयाबद्दल शंका आहे, तुमच्या मनातील या आणि अशा सर्व प्रश्नाची, शंकाची उत्तरे तुम्हाला पोलिसांकडुन मिळतील. मात्र त्यासाठी तुम्हाला पोलिसांना तुमचा प्रश्न, शंका व्हाटस्अपद्वारे कळवावी लागेल, त्याचे उत्तरही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारेच मिळेल.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारपासून कलम 144 अन्वये संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते. त्यापूर्वी राज्य सरकारच्या आदेशानुसार, सोमवारी जमावबंदीचा आदेश देण्यात आला. त्यानंतरही गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांनी पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनाना वाहतुकीसाठी बंदी घातली. 

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

दरम्यान, या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरीकांना कलम 144, संचारबंदी, वाहतुक बंदी याबाबत अनेक प्रश्न, शंका व त्यांना अडचणी येत आहेत. त्यावर नेमके कोण अधिकृत उत्तर देऊ शकेल, असा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात होता. पुणे पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन नागरीकांच्या प्रश्न व शंकाचे निरसन करण्याचे ठरविले आहे.

Coronavirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; आकडा गेला...
पोलिसांनी चार व्हाट्सअप क्रमांक दिले आहेत. ज्या नागरीकांना प्रश्न आहेत, त्यांनी पोलिसांनी दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर आपल्या मोबाईलवरुन आपला प्रश्न पाठवायचा आहे. नागरीकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या मोबाईलवरिल व्हॉट्सअपवर मिळणार आहे. मात्र नागरीकांना कोणतीही सुट हवी असल्यास ती केवळ अपवादात्मक परिस्थितीतच मिळणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Corona Virus : पुणेकरांची मार्केटयार्डात खरेदी-विक्रीसाठी गर्दी; अखेर पोलिसांनी...

या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवा तुमचे प्रश्न

9145003100
8975283100
9169003100
8975953100

"नागरीकांना येणारे प्रश्न व शंका ते व्हाट्सअपद्वारे आम्हाला कळवु शकतील, व्हॉटस्अपद्वारेच त्यांना त्याचे उत्तर मिळेल. मात्र, सूट ही केवळ अपवादात्मक परिस्थितीतच दिली जाईल."
- बच्चन सिंग,पोलिस उपायुक्त, (गुन्हे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen Can Ask Questions Or Doubts about Act 144 to Pune Police Via Whatsapp