जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास दिली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जात नव्हती. परंतु आता काही अटी व शर्तींचे पालन पालन करून ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनाच बैठकीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. सभा शक्‍यतो मोकळ्या जागेत घेण्यात यावी. तोंडास मास्क लावणे, सोशल डिस्टनस पाळणे अशी बंधने घालण्यात आली आहे.

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जात नव्हती. परंतु आता काही अटी व शर्तींचे पालन पालन करून ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनाच बैठकीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. सभा शक्‍यतो मोकळ्या जागेत घेण्यात यावी. तोंडास मास्क लावणे, सोशल डिस्टनस पाळणे अशी बंधने घालण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रत्येक महिन्यात मासिक सभा घेतली पाहिजे, अशी सभा घेण्यास सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्तितीत उपसरपंच यांनी कसूर केल्यास त्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आहे. परंतू याबाबत सभा न घेण्यासाठी पुरेसे कारण होते किंवा नव्हते. या प्रश्‍नावरील जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम असेल अशी तरतूद कलम 36 मध्ये आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयच्या उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जमावबंदीचे काटेकोर पालन करत असताना ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जात नव्हती. 

प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायतीची मासिक सभा घेणे कायद्याने बंधनकारक असल्याने करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. अशा रितीने सेनिटायझरचा वापर करणे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे आदींचे पालन करून ग्रामपंचायतीची मासिक सभा घेण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परवानगी दिली आहे. 

मासिक सभा घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक ती काळजी घेण्याचे बंधनकारक आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार दंडात्मक तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही संबधित पोलिस अधिकारी यांनी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector gives permission to Gram Panchayat to hold Gram Sabha