Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये तीन नवीन पाॅझिटिव्ह; आकडा पोहचला 26 वर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

शहरातील पाॅझिटीव्ह व्यक्तींची संख्या गेल्या पाच दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. चार एप्रिल रोजी रात्री पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यामुळे उपचार घेत असलेल्यांची संख्या आठ झाली होती. तर, बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 12आहे. मात्र, गेल्या 72 तासात तब्बल सहा जण पाॅझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.​

पिंपरी - कोरोना संशयित म्हणून गुरुवारी घेतलेल्या 40 पैकी तीन जणांचे अहवाल शुक्रवारी पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 26 झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील पाॅझिटीव्ह व्यक्तींची संख्या गेल्या पाच दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. चार एप्रिल रोजी रात्री पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यामुळे उपचार घेत असलेल्यांची संख्या आठ झाली होती. तर, बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 12आहे. मात्र, गेल्या 72 तासात तब्बल सहा जण पाॅझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. चिखली घरकुल, खराळवाडी, थेरगाव पडवळनगर,  दिघी हे भाग मंगळवारपासून सील केले. गुरुवारी मध्यरात्रीपासून भोसरीतील काही भाग सील केला. त्यात शुक्रवारी वाढ करण्यात आली.

भोसरी, दिघी, थेरगाव सीलक्षेत्र वाढवले
महापालिका व पोलिस प्रशासनाने शुक्रवारी (ता. 10) रात्री अकरापासून भोसरी, दिघी व थेरगाव भागात सील केलेल्या परिसराचे क्षेत्र वाढविले. पुढील आदेश येईपर्यंत हा भाग बंद ठेवण्यात आला आहे. 

भोसरी गावठाण - चांदणी चौक,  मुख्य रस्ता, मॅन्जुनिअस केक शाॅप, मेघनाद सोनोग्राफी केंद्र, लांडेवाडी रस्ता, कर संकलन कार्यालय, गव्हाणे चौक, लोंढे गिरणी, विनय सुपर मार्केट, तुळजाभवानी मंदिर, मारुती मंदिर, क्रांतिवीरनगर.

थेरगाव गावठाण - रहाटणी लिंक रस्ता, स्वस्तिक डायमंड अपार्टमेंट, आस्था मेडिकल, हाॅटेल सिल्वर नाईन रस्ता, आॅरा सोसायटी. तसेच, डांगे चौक- बिर्ला हाॅस्पिटल- तापकीर चौक- काळेवाडी फाटा - डांगे चौक.

दिघी गावठाण - स्कायलाइन सोसायटी, हाॅटेल द्वारकाधीश, ओम सुपर मार्केट, फेज थ्री रस्ता, ओम साई नर्सरी, श्रीसाई हाॅस्पिटल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus 26 patients in pimpri chinchwad

Tags
टॉपिकस
Topic Tags: