coronavirus: निर्जंतुकीकरण चेंबर्समध्ये काय काळजी घ्याल 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

स्वच्छतागृहे, कचराकुंड्या,रस्ते आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यात येतो.मानवी शरीराच्या निर्जंतुकीकरणासाठी सोडिअम हायपोक्‍लोराईटचे प्रमाण 0.2 ते 0.5 टक्‍क्‍यापर्यंत वापरण्यात येते

पुणे - हॉस्पिटल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या सार्वजनिक ठिकाणी डॉक्‍टरांसह, पोलिस आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी निर्जंतुकीकरण चेंबरचा वापर करण्यात येत आहे. तर, काही सोसायट्या आणि आस्थापनांनीही याचा वापर सुरू केला आहे. निर्जंतुकीकरणासाठी नक्की कोणते रसायन वापरतात आणि त्याचे प्रमाण किती असावे हे माहीत असणे गरजेचे आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कसा कराल वापर... 
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार सोडिअम हायपोक्‍लोराईटचा वापर करणे अपेक्षित आहे. स्वच्छतागृहांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्येही 5 ते 6 टक्के सोडिअम हायपोक्‍लोराईट असते. त्यामुळे स्वच्छतागृहे, कचराकुंड्या, रस्ते आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यात येतो. मानवी शरीराच्या निर्जंतुकीकरणासाठी सोडिअम हायपोक्‍लोराईटचे प्रमाण 0.2 ते 0.5 टक्‍क्‍यापर्यंत वापरण्यात येते. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ही घ्या काळजी 
- निर्जंतुकीकरणासाठी पाण्यामध्ये 0.2 ते 1 टक्‍क्‍यापर्यंत सोडिअम हायपोक्‍लोराईट वापरावे 
- 100 लिटर पाण्यासाठी 200 मिलिलिटर ते अर्धा लिटर या प्रमाणात सोडिअम हायपोक्‍लोराईट वापरावे 
- सोडिअम हायपोक्‍लोराईट प्रमाण जास्त झाल्यास चेहरा, डोळे, नाक आदी संवेदनशील भागाला इजा 
- तीन ते चार वर्षाखालील मुलांनी शक्‍यतो टाळावेच 
- 12 फूट लांबीच्या चेंबरमध्ये 10 ते 15 सेकंदात निर्जंतुकीकरण होते 
- निर्जंतुकीकरणाची फवारणी धुक्‍याच्या माध्यमातून होणे गरजेचे 

महापालिकेच्या वतीने कोरोनाबाधित प्रदेशात निर्जंतुकीकरण संयंत्र वापरण्यात आली आहे. त्यामध्ये 1 टक्के सोडिअम हायपोक्‍लोराईट वापरण्यात आले आहे. काही सोसायट्यांनी आणि नगरसेवकांनी प्रभागांमध्ये निर्जंतुकीकरण चेंबर्स बसविले आहे. खबरदारी म्हणून त्यांची माहिती लवकरच मागविण्यात येणार असल्याचे 
- डॉ. वैशाली जाधव, साहय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका पुणे 

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार 0.5 टक्के सोडिअम हायपोक्‍लोराईट वापरून मिस्ट सॅनिटायझर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत विकसित करण्यात आला आहे. त्यामध्ये सोडिअम हायपोक्‍लोराईटचे प्रमाण 0.2 ते 1 टक्‍क्‍यापर्यंत वाढवून विविध निरीक्षणे घेण्यात येणार आहे. प्रयोगशाळेतील सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ निर्जंतुकीकरणाची मानवी शरीरावर होणार परिणामही अभ्यासणार आहे. 
- डॉ. प्रभाकर इंगळे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus care about in sterile chambers