पुण्यात कात्रज भागात गॅस सिलिंडरची वेगळीच समस्या; वाचा सविस्तर बातमी

टीम ई-सकाळ
बुधवार, 25 मार्च 2020

रोना आजारामुळे नागरिक धास्तावलेले आहेत. जीवनावश्यक वस्तू मिळतील की नाही,याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पुणे Coronavirus : कोरोनामुळे पुण्यात लॉक डाउनला असला तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहील असे जिल्हा  प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, कात्रज परिसरात गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. दरम्यान, गॅस एजन्सीने कोणत्याही स्थितीत घरपोच सिलेंडर दिला पाहिजे, असे भारत पेट्रोलियमकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना आजारामुळे नागरिक धास्तावलेले आहेत. जीवनावश्यक वस्तू मिळतील की नाही,याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। अशा स्थितीत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम जीवनावश्यक वस्तू मिळण्याची ठिकाणे सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे तरीही कात्रज भागातून घरपोच सिलेंडर मिळत नसल्याचे चित्र आहे.  याबाबत राजाराम गॅस एजन्सी यांच्याशी संपर्क साधला असता एजन्सीचे श्रवण जाजू यांनी सांगितले की घ,रपोच सेवा देणारे कर्मचारी कामावर नसल्याने कामावर आले नसल्याने हा प्रश्न काही भागात निर्माण झाला. सिलेंडरची घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन्यथा तक्रार करा
नागरिकांना घरपोच गॅस सिलेंडर देणे ही ही गॅस एजन्सीची जबाबदारी आहे. यात टाळाटाळ केली जात असेल व काही कारणं सांगितली जात असे असतील तर जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा पुरवठा आणि अन्नधान्य वितरण विभागाकडे तक्रार करावी, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाशी संबंधित अपडेट्स वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरपोच सेवा बंधनकारक
भारत पेट्रोलियम लिमिटेडचे प्रादेशिक अधिकारी सौरभ मुखर्जी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली असता, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित एजन्सीकडे विचारणा केली. त्यावर उद्यापासून (ता. 26) सिलेंडर पुरवठा सुरळीत आणि घरपोच दिला जाईल, अशी ग्वाही एजन्सीकडून देण्यात आली आहे. मुखर्जी याबाबत सकाळची बोलताना म्हणाले "आपत्कालीन परिस्थिती असली तरी एजन्सीने घरपोच सिलेंडर देणे क्रमप्राप्त आहे. गोडाऊन वा एजन्सीचे ऑफिस याठिकाणी सिलेंडर विक्री करता येणार नाही त्यामुळे सर्व गॅस एजन्सीने सिलेंडरचा पुरवठा नागरिकांना घरपोच केला पाहिजे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown pune updates katraj gas cylinder home delivery issue