पिंपरीत कोरोनाचा पहिला बळी; तीन दिवसांत मृत्यूमुखी

टीम ई-सकाळ
Sunday, 12 April 2020

हिंजवडी परिसरात सिक्युरिटीचे काम करणाऱ्या या व्यक्तीची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती.

पिंपरी Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात 45 वर्षीय पुरुषावर आठ दिवसांपासून सुरु होते. सायंकाळच्या सुमारास त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीला 9 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंजवडी परिसरात सिक्युरिटीचे काम करणाऱ्या या व्यक्तीची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. अवघ्या तीन दिवसांत या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(सविस्तर बातमी आम्ही येथेच अपलोड करत आहोत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pimpri chinchwad first death ycm hospital