Corona Virus : 'असे' होतात कोरोनाग्रस्तांवर उपचार; 'ही' बातमी वाचाच!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

श्वसनाशी निगडित आजाराला कारणीभूत कोरोना विषाणूने 2002 आणि 03 मध्येही जागतिक महामारीचे स्वरुप धारण केले होते. त्याचेच सुधारित प्रारूप असलेला आजचा कोरोना विषाणू म्हणजेच "सिव्हीयर अक्‍यूट रेस्पायरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस -2' (सार्स कोविड-2) हा "कोविड-19' या संसर्गजन्य रोगास कारणीभूत ठरला आहे. आधीच्या म्हणजेच "सार्स कोविड' विषाणूच्या उपचारपद्धतीच्या आधारे सध्याची उपचारपद्धत विकसित करण्यात आली आहे. औषधाचा शोध न लागल्यामूळे यावरील अधिक प्रभावी उपचारपद्धतीसाठी अजूनही संशोधन चालू आहे. 

पुणे : कोविड-19 वर सध्यातरी कोणतेही औषध उपलब्ध नाही. असे असताना डॉक्‍टर कोरोनाग्रस्तांवर उपचार कसे करतात याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. कोरोनाबाधितांवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या आधारे भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि आरोग्य मंत्रालयाने उपचाराची पद्धत निश्‍चित केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
श्वसनाशी निगडित आजाराला कारणीभूत कोरोना विषाणूने 2002 आणि 03 मध्येही जागतिक महामारीचे स्वरुप धारण केले होते. त्याचेच सुधारित प्रारूप असलेला आजचा कोरोना विषाणू म्हणजेच "सिव्हीयर अक्‍यूट रेस्पायरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस -2' (सार्स कोविड-2) हा "कोविड-19' या संसर्गजन्य रोगास कारणीभूत ठरला आहे. आधीच्या म्हणजेच "सार्स कोविड' विषाणूच्या उपचारपद्धतीच्या आधारे सध्याची उपचारपद्धत विकसित करण्यात आली आहे. औषधाचा शोध न लागल्यामूळे यावरील अधिक प्रभावी उपचारपद्धतीसाठी अजूनही संशोधन चालू आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 संसर्गामुळे नक्की काय होते? 
कोविड-19ला कारणीभूत सार्स कोविड-2 हा विषाणू प्रामुख्याने संसर्गग्रस्त व्यक्तीच्या श्वसनमार्गाच्या खालच्या भागात आढळतो. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे रुग्णाला प्रामुख्याने न्यूमोनिया (फुफ्फुसे निगडीत) सारखा आजार होतो. रोग्याची प्रतिकारशक्ती कमी असल्यास परिपूर्ण उपचार न मिळाल्यास तो दगावतो. 

कोरोनावर आता ‘आयुष’ औषधांची मात्रा 

कोविड-19ची लक्षणे 
1) सामान्य लक्षणे: श्वसनमार्गाच्या वरच्या भागात प्रथमतः विषाणू प्रवेश करतो. यामुळे ताप, खोकला, घसा दुखणे, शिंका येणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात. 

2) सौम्य न्यूमोनिया: लहान मुलांना श्वसनासंबंधी त्रास उद्भवतो. 

3) गंभीर न्यूमोनिया: प्रौढ व्यक्ती: ताप किंवा श्वसनमार्गात संसर्ग, सामान्य वातावरणात श्वास घेणे शक्‍य होत नाही. 
लहान मुले: छाती भरून येणे, श्‍वासोच्छवासाला भयंकर त्रास होणे. 

4) अक्‍यूट रेस्पायरेटरी डिस्ट्रीस सिंड्रोम: दोनही फुफ्फुसे निकामी होतात. 

Corona Virus : कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी आयुर्वेद डॉक्टरांची तयारी

उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना: 
आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चार टप्प्यातील उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्‍चित करण्यात आल्या आहेत. 

1) संशयित रुग्ण आढळल्यास: संशयिताला विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. शस्त्रक्रियेच्या वेळी वापरण्यात येणार तीन पडद्यांचा मास्क देण्यात येतो. परिसराचे निर्जंतुकीकरण करणे. बाधित रुग्णाच्या श्वसनमालिकेतील द्रव पदार्थाच्या माध्यमातून संसर्ग होतो. त्यामुळे इतरांना थेंबांतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी. रोगाची कारणमीमांसा होईपर्यंत सर्व खबरदारीचे उपाययोजनांचा अवलंब करावा. रुग्णाच्या हालचाली नियंत्रित कराव्यात. 

2) बाधित रुग्ण आढळल्यास: आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई किटचा वापर करणे, एन95 मास्क वापरणे, उच्च दर्जाचे तंत्रज्ञानाने परिसराचे निर्जंतुकीकरण करणे. 

3) सुरवातीचे उपचार: 
- आवश्‍यकता असल्यास सप्लिमेंटल ऑक्‍सिजन थेरपी 
- उपलब्ध प्रतिजैविक औषधे (न्यूमोनियाची लक्षणांप्रमाणे) 
- रुग्णाच्या मायक्रोबायोलॉजीकल रिपोर्ट प्रमाणे औषधांची मात्रा 
- सातत्याने कार्टिकोस्टेरॉईडचा वापर टाळावा 
- रुग्णाच्या बदलत्या लक्षणानूसार आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे उपचार 
- प्रतिकारशक्ती वाढविणारे औषधोपचार 
- सिव्हीयर ऍक्‍यूट रेस्पायरेटरी इलनेसशी (सारी) निगडित मार्गदर्शक उपचारांचा वापर 

4) रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण घटणे आणि एआरडीएस 
- हायपोक्‍झॅमीक रेस्पायरेटरी फेल्यूअर झाल्यावर ऑक्‍सिजन थेरपीचा वापर करावा 
- रिझर्वायर बॅग किंवा मास्क द्वारे ऑक्‍सिजन द्यावा (10-15 लिटर प्रति मिनीट) 
- आवश्‍यकता भासल्यास मेकॅनिकल व्हेंटीलेशनचा वापर 
- परिस्थिती गंभीर झाल्यास लाइफ सपोर्ट सिस्टमचा वापर 
 

Coronavirus : उरुळी कांचन : कोरोनाग्रस्त महिला इतरांच्या संपर्कात अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you know How Coronavirus treatment is given