Coronavirus : विद्यार्थ्यांसाठी धुत कुटुंबीय ठरले अन्नदाता

समाधान काटे
गुरुवार, 26 मार्च 2020

मी सांगलीतील असून, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून काम करतो. संचारबंदीमुळे माझ्या जेवणाचे हाल झाले होते. मात्र धूत यांनी जेवणाचे डबे उपलब्ध करून दिले.
 - प्रदिप सुतार,फार्मासिस्ट

मयुर कॉलनी - कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीमुळे जेवणाचे हाल झालेल्या स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी कोथरूडमधील धुत कुटुंबीय अन्नदाता ठरले आहे. शहरातील सुमारे ३५ ते ४० विद्यार्थ्यांना ते मोफत जेवणाचे डबे पुरवत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात राज्याच्या कोनाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. मात्र संचारबंदीमुळे सध्या शहरातील हॅाटेल, मेस बंद असल्याने या विद्य़ार्थ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. या परिस्थितीत सामाजिक संस्था, समाज सेवक पुढे येऊन विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे देत आहेत. अशा विद्यार्थ्यांना कोथरूडमधील धूत कुटुंबीय अन्नदाता ठरले आहे. शिवतीर्थनगरमधील समीर धूत, त्यांची आई व पत्नी सध्या घरगुती जेवण तयार करून या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पोच करत आहेत. कोथरूड, कर्वेनगर, डेक्कन, प्रभात रोड, पौड फाटा, सदाशिव पेठ, परिसरातील सुमारे 40 विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. समाजातील दानशूर, सामाजिक संस्था, समाजसेवकांनी पुढाकार घेऊन या कार्यात सहभागी व्हावे, अशी मागणी धूत यांनी व्यक्त केली आहे.

मी सांगलीतील असून, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून काम करतो. संचारबंदीमुळे माझ्या जेवणाचे हाल झाले होते. मात्र धूत यांनी जेवणाचे डबे उपलब्ध करून दिले.
 - प्रदिप सुतार,फार्मासिस्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food donors become dhut family members for students