महावीर जयंती साजरी न करता त्यांनी केलं असं काही...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

- खडकीतील जैन समाजाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाला १,११,००० रुपयांची देणगी  

खडकी बाजार : लॉकडाऊन व संचारबंदीमुळे यंदा महावीर जयंती व मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर होणारा खर्च कोरोनाशी सामना करण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिला. 

Money

जैन समाज खडकीच्या वतीने १ लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रमोदकुमार सिंह यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य कमलेश चासकर व जैन समाज खडकीचे ज्येष्ठ पदाधिकारी व सभासद तसेच बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jain Community Khadki helps of Rs 111000 to Cantonment Board