Video : 'लाॅकडाऊन कट्टा" मधून मनोरंजनाचा फवारा !

गणेश बोरुडे
Monday, 20 April 2020

कोरोना लाॅकडाऊन दरम्यान घरात बसून कंटाळलेल्या तळेगावकरांसाठी स्थानिक कलाकारांनी फेसबुकच्या माध्यमातून "लाॅकडाऊन कट्टा" हा ऑनलाईन कार्यक्रम सुरु केला आहे.या माध्यमातून दहा दिवस मनोरंजनात्मक सॅनिटायझरचा फवारा तळेगावकरांवर होणार आहे.

तळेगाव स्टेशन - कोरोना लाॅकडाऊन दरम्यान घरात बसून कंटाळलेल्या तळेगावकरांसाठी स्थानिक कलाकारांनी फेसबुकच्या माध्यमातून "लाॅकडाऊन कट्टा" हा ऑनलाईन कार्यक्रम सुरु केला आहे.या माध्यमातून दहा दिवस मनोरंजनात्मक सॅनिटायझरचा फवारा तळेगावकरांवर होणार आहे.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तळेगाव दाभाडे म्हणजे ग्रामीण भागातील कलेचं माहेरघर.एरव्ही आठवडाभरात किमान दोन तीन तरी कला सांस्कृतिक कार्यक्रम तळेगावात होतच असतात.त्यातच महीनाभराच्या टाळेबंदी दरम्यान निश्चिंत बसून राहतील ते तळेगावकर असे शक्यच नाही.घरात बसून कंटाळलेल्या तळेगावकरांना जरा रिफ्रेश करण्यासाठी आरोग्य,कला,ज्ञान अन् संस्कृतीने ओतपोत भरलेला "लाॅकडाऊन कट्टा" हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम २१ ते ३० एप्रिल दरम्यान कार्यक्रम सादर होणार आहे.

यशवंत प्रतिष्ठान आणि नगरसेवक निखील भगत यांच्या संकल्पनेतून या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा फेसबुकींना आनंद घेता येणार आहे. आरोग्यसाठी बी फिट,लहान मुलांसाठी गंमत जंमत गट्टू,श्रोत्यांसाठी वाचू आनंदे व्याख्यानमाला तसेच तुमच्यात दडलेल्या कलाकारांसाठी जस्ट चील आदी कार्यक्रम स्थानिक कलाकार सादर करणार आहेत.लाॅकडाऊन दरम्यान घरात बसून कंटाळलेल्या तळेगावकरांचे यातून रोज किमान दोन तास मनोरंजन होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown katta entertainment Facebook Live