Coronavirus : लॉकडाउन ४९ दिवसांचा आवश्यक

Map
Map

पुणे - देशात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी ४९ दिवसांच्या सलग 'लॉकडाउन'ची आवश्यकता असल्याचे एका शोधनिबंधातून स्पष्ट झाले आहे. केंम्ब्रिज विद्यापीठातील राजेश सिंग आणि चेन्नई येथील दि इंस्टिट्यूट ऑफ मॅथेमेटीकल सायन्सेसचे आर. अधिकारी यांचे हे संशोधन 'अरकाईव्ह' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

शोधनिबंधामध्ये चीन, इटली आणि भारतातील कोरोना प्रसाराचे संख्याशास्त्रीय पद्धतीने अध्ययन करण्यात आले आहे. या तीनही देशातील लोकांच्या वयांतील फरक, सामाजिक राहणीमान आणि कामाची ठिकाणे या आधारावर हे विश्लेषण करण्यात आले आहे. देशात २५ मार्चला घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउन आधी व नंतर मिळालेल्या सुरवातीच्या आकडेवारीवर हे संशोधन करण्यात आले आहे. त्यामध्ये २१ दिवसांचा लॉक डाउन पुरेसा नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. 

हा 'लॉकडाउन' पुढे १३ मे पर्यंत वाढविण्यात आला नाही, तर १४ एप्रिल नंतर गुणाकार पद्धतीने कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. तसेच लोकांनी सामाजिक अंतर आणि संचारबंदीचे काटेकोर पालन केले, तरच लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

विश्लेषण मर्यादा
  भारतात समूह प्रसाराचे उदाहरण किंवा पद्धत निश्चित नाही. त्यामुळे संख्येत आणि कालावधीत बदल होऊ शकतो.
  सुरवातीचीच आकडेवारी विचारात घेतल्यामुळे थोडा बदल अपेक्षित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com