केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्य;जिल्ह्यात एक मेपासून वाटप सुरू 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील तीन लाख केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशन दुकानातून गहू आणि तांदूळ देण्यात येणार आहे. येत्या एक मेपासून केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण होईल. 

पुणे - जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील तीन लाख केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशन दुकानातून गहू आणि तांदूळ देण्यात येणार आहे. येत्या एक मेपासून केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण होईल. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्यातील हवेलीसह ११ तालुक्यामध्ये सध्या अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिलचे धान्य वितरित करण्यात येत आहे. या महिन्यातील सुमारे ९० टक्के लाभार्थ्यांना गहू-तांदूळ वितरित करण्यात आला आहे.अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना गहू २ रुपये प्रति किलो आणि तांदूळ ३ रुपये प्रति किलो दराने वितरित करण्यात येत आहे. तसेच, पंतप्रधान कल्याण योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. सुमारे ८० टक्के कार्डधारकांना मोफत तांदळाचे वितरण केले आहे. सर्व कार्डधारकांना एप्रिल ते जून दरम्यान त्या त्या महिन्यात मोफत तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. 

आणखी वाचा - उद्धवजी लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही

राज्य सरकारने केशरी कार्डधारकांनाही गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यामुळे आता केशरी कार्डधारकांनाही रास्त दरात गहू आणि तांदूळ देण्यात येणार असून, त्याचे वितरण येत्या एक मेपासून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली. 

केशरी कार्डधारकांना गहू प्रतिव्यक्ती तीन किलो तर, तांदूळ प्रति व्यक्ती दोन किलो मिळणार आहे. केशरी कार्डधारकांसाठी गहू आठ रुपये प्रति किलो दराने आणि तांदूळ प्रति किलो १२ रुपये दराने मिळणार आहे. 

धान्य वाटपात अनियमितता 
जुन्नर तालुक्यात तपासणीदरम्यान एका रेशन दुकानांमध्ये धान्य वाटपात अनियमितता आढळून आली. त्यामुळे संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From May 1 the kesari ration card holders will get grain in the district

Tags
टॉपिकस
Topic Tags: