esakal | चिंताजनक : पुण्यात नर्सला कोरोनाची लागण; आणखी 30 नर्स क्वारंटाइन
sakal

बोलून बातमी शोधा

nurse from ruby hospital got affected coronavirus 30 nurses quarantine

करोना पॉझिटिव्ह असलेल्या नर्स ला दोन दिवसापूर्वी ताप आला होता. तिची तपासणी केली असता तिला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

चिंताजनक : पुण्यात नर्सला कोरोनाची लागण; आणखी 30 नर्स क्वारंटाइन

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे Coronavirus : शहरातील नामांकित असलेल्या रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागाच्या इंचार्ज असलेल्या एका नर्सचा (परिचारिका) करोना अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह  आला.  त्यामुळे तिच्या शिफ्ट ला काम करणाऱ्या आणखी 30 नर्सना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

करोना पॉझिटिव्ह असलेल्या नर्स ला दोन दिवसापूर्वी ताप आला होता. तिची तपासणी केली असता तिला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या नर्सचे वय 50 असून तिच्यावर रुबीमध्येच उपचार सुरू आहेत. तसेच तिच्यासोबत काम करण्याऱ्या नर्स आणि संपर्कात आलेल्या 30 जणांना प्रशासनाने क्वारंटाइन केले आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या मुख्य इमारतीमध्ये एच नावाचा वॉर्ड असून, तेथे ही नर्स इंचार्ज म्हणून कार्यरत आहे. तसेच येथे आणखी इतर उपचाराआठी रुग्णदेखील दाखल असून, त्यांची देखील नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याचे येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरने सांगितले आहे. दरम्यान नर्सलाच करोनाची बाधा झाल्याने येथील डॉक्टरही धास्तावले आहेत. मात्र, रुग्णालयाकडून सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू असून, ही नर्स रुग्णांच्या संपर्कात नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे काहीशी भीती कमी झाली असली तरी, खबरदारी म्हणून रुग्णांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

आणखी वाचा - भारतात चाचण्या केलेल्यांपैकी केवळ 4 टक्केच पॉझिटिव्ह

रुग्णालयातील सुमारे तीस नर्सेसला क्वारंटाइन केले आहे. त्यांच्यापैकी काही मुख्य नर्सच्या संपर्कात आल्याने त्यांच्या चाचणी केल्या जात आहेत. लागण झालेली नर्सचा थेट रुग्णांशी संपर्क नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. इतर नर्सेसना क्वारंटाइन केले आहे.
- डॉ. संजय पठारे, वैद्यकीय संचालक रुबी हॉल

loading image