पुण्यात लॉकडाऊनची पकड ढिली ?... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

लॉकडाऊन, सील अन संचारबंदीची पकड ढिली झाल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या भागातील लोक घरातून  बाहेर केव्हा पडतात, नेमके कोणत्या कामांसाठी, परिसरातील स्थिती काय याची नोंदविलेली निरीक्षणे.

पुणे -शहर आणि उपनगरांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. प्रशासनाने त्याला पायबंद घालताना लॉकडाऊन, सील आणि संचारबंदीचे उपायही योजले आहेत. त्यातून गल्लीबोळही "ब्लॉक' केले आहेत. त्याचप्रमाणे लोकांची सोय म्हणून व अत्यावश्‍यक वस्तू खरेदीसाठी रोज काहीवेळ त्यांना घराबाहेर पडण्याची मुभाही मिळाली आहे. पण गर्दी न करण्याच्या अटी घातल्या आहेत. तरीही किरणा दुकानांपासून, भाजी आणि औषधे खरेदीला गर्दी होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोशल डिस्टनशिंगला हरताळ फासला जात आहे. विनाकारण नागरिक बाहेर पडत आहेत. त्यातून लॉकडाऊन, सील अन संचारबंदीची पकड ढिली झाल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या भागातील लोक घरातून  बाहेर केव्हा पडतात, नेमके कोणत्या कामांसाठी, परिसरातील स्थिती काय याची दिवसभरातील नोंदविलेली निरीक्षणे पुढीलप्रमाणे... 

Coronavirus : जगभरात कोणत्या देशात किती कोरोना रुग्ण? वाचा सविस्तर बातमी

कोथरूड 
- सकाळी 8 ते 1 सायंकाळी 4 ते 8 
- भाजीपाला, किराणा, औषधे खरेदी 
- गल्लीबोळात मुलांची गर्दी 
- पोलिसांचा बैठा बंदोबस्त 
- सायंकाळीही काही ठिकाणी लोकांची वर्दळ 

सिंहगड रस्ता 
- सकाळी 8 ते 1 सायंकाळी 5 ते 8 
-किराणा, भाजी, दूध खरेदी 
- मास्क, सॅनिटायझर खरेदी 
-पोलिसांची नाकाबंदी 
- अन्य दुकानेही सुरू असल्याचे चित्र 

बाणेर, बालेवाडी 
- सकाळी 8 ते 12 सायंकाळी 5 ते 8 
- औषधे, किराणा, भाजी, फळे खरेदी 
- नाकाबंदी असूनही लोकांची ये-जा 
- काही ठिकाणी संचारबंदीला प्रतिसाद 

बावधन 
- सकाळी 8 ते 12 सायंकाळी 5 ते 8 
- औषधे, दूध, किराणाची खरेदी. 
- पोलिसांचा बंदोबस्त 
- काही ठिकाणी युवा टोळकी गप्पा मारताना दिसतात. 

औंध गावठाण, पाषाण- 
- सकाळी 8 ते 12 सायंकाळी 5 ते 8 
- किराणा साहित्य दूध, भाजी, औषध खरेदी 
- पोलिसांचा फिरता बंदोबस्त 
- संचारबंदीचे पालन नाही 

आंबेगाव 
- सकाळी 8 ते 12 सायंकाळी 5 ते 8 
- भाजीपाला, औषधे, किराणा, फळ खरेदी 
- पोलिसांच्या परिसरात फेऱ्या 
- सकाळी पुरुष कट्ट्यावर गप्पा मारताना बसलेले दिसतात. 

हडपसर 
- सकाळी 8 ते 12 सायंकाळी 6 ते 9 
- फळे, भाजीपाला, औषधे, दूध, किराणा 
- चौका-चौकात पोलिस 
- विनाकारण बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: observations of lockdown and curfew in pune city aera