coronavirus: पुण्यामध्ये अडकल्यामुळे परराज्यातील प्रवासी हतबल 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

पुण्यात जवळपास वीस दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. लॉकडाउनमुळे राज्यांच्या सीमा बंद असल्याने त्यांना  हैदराबादला जाण्यास अडचणी येत आहे.

पुणे - परदेशात प्रवास करून आलेले परराज्यातील काही प्रवासी लॉकडाउनमुळे पुण्यात अडकून पडले आहेत. आंतरराज्यांच्या सीमा बंद (सील) केल्यामुळे त्यांना घरी परत जाण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. याबाबत सरकारकडे अर्ज करून देखील त्यांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हे प्रवासी हतबल झाले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात पहिला कोरोनाचा रुग्ण पुण्यात आढळून आला होता. त्यामुळे विमानतळावर येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारने दिले. लोहगाव विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करून त्यांना किमान 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान हैदराबाद येथील काही प्रवासी दुबईवरून परत येताना कनेक्‍टिंग फ्लाइट असल्याने पुण्यात आले. त्यानंतर ते पुण्यावरून हैदराबादला जाणार होते. मात्र, प्रशासनाने त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठवून दिले. तसेच त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले. त्यांचे त्याचा कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना आता पुण्यात जवळपास वीस दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. लॉकडाउनमुळे राज्यांच्या सीमा बंद असल्याने त्यांना  हैदराबादला जाण्यास अडचणी येत आहे. या संदर्भात त्यांनी आंध्रप्रदेश सरकारशी संपर्क साधला. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे हे प्रवासी आता हतबल झाले असून घरी जाण्यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तगादा लावला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: other state passengers facing problems due to lockdown