Video : पोलिस मित्र घेताहेत पोलिसांची काळजी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

कोरोना सारख्या संकट स्थितीतही पोलीस जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. या संसर्गाचा धोका ओळखून राज्य पोलीस मित्र संघटना व मुकूल माधव फौंडेशन यांच्या सहयोगाने पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.

पिंपरी - कोरोना सारख्या संकट स्थितीतही पोलीस जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. या संसर्गाचा धोका ओळखून राज्य पोलीस मित्र संघटना व मुकूल माधव फौंडेशन यांच्या सहयोगाने पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलीमा जाधव यांच्या उपस्थित सोशल डीस्टसिंगचे भान राखून मास्क व हॅन्ड सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले. त्या म्हणाल्या, "प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक हा पोलीस आहे. त्याने स्वत:चे आरोग्य सांभाळून इतरांच्या आरोग्यासाठी ही लढाई लढायची आहे. याकरिता प्रत्येकाने योग्य ती दक्षता घ्यावी.'

पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते  व जिल्हा सचिव सुमित दरंदले यांच्या पुढाकाराने  हा उपक्रम राबविला.  यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे, खडकी पोलीस निरीक्षक संगीता पाटील, प्रविण दोडके, संजय गोतावळे, नितीन रणदिवे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police friends are taking care of the police