Coronavirus : नायडू रूग्णालयाला पुरवा आरोग्य सेवांसाठीची साधने - शेखर गायकवाड

naidu hospital pune
naidu hospital pune

पुणे - महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील सेवा-सुविधा वाढवून, तेथील उपचारांचा दर्जा सुधारण्यात येत आहे. त्यासाठी 'सीएसआर' अंतर्गत निधी उपलब्ध होत आहे. 

या उपक्रमात पुणेकरांनीही आर्थिक आणि आरोग्य सेवांसाठीची साधने पुरवून मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शनिवारी केले आहे.

डॉ. नायडू रूग्णालयात रुग्णांसोबत तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी नव्या सुविधा पुरविण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने प्राथमिक टप्प्यातील कामेही हाती घेतल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

डॉ. नायडू रुग्णालयाची १८० खाटांची क्षमता असन, सध्या कोरोनाची लागण झालेल्या आणि संशयित अशा ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक त्या सुविधा वाढविण्यात येत आहेत.

त्यासाठी आतापर्यंत 'सीएसआर' आणि अन्य क्षेत्रातून मदत होत आहे. ती वाढल्यास नव्याने काही कामे हाती घेता येतील आणि रूग्णांना दर्जेदार उपचार मिळतील, असेही गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com