पुणे पोलिसांनी साडे तीन हजार ज्येष्ठांना पुरविल्या विविध प्रकारच्या सुविधा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

संचारबंदी सुरू असल्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी भरोसा कक्षाच्या माध्यमातून चांगलाच दिलासा देण्यात आला आहे. उपचार, औषधे, किराणा, भाजी, जेवण अशा वेगवेगळ्या कारणांसाठी १३६ ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांची मदत घेतली. तसेच पोलिसांनी साडे तीन हजार ज्येष्ठ नागरिकांना जेवण, रेशन व औषधे पुरविण्याचे काम केले.

पुणे - संचारबंदी सुरू असल्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी भरोसा कक्षाच्या माध्यमातून चांगलाच दिलासा देण्यात आला आहे. उपचार, औषधे, किराणा, भाजी, जेवण अशा वेगवेगळ्या कारणांसाठी १३६ ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांची मदत घेतली. तसेच पोलिसांनी साडे तीन हजार ज्येष्ठ नागरिकांना जेवण, रेशन व औषधे पुरविण्याचे काम केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. संचारबंदी आदेश लागू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे कसे होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याची पुणे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत ज्येष्ठ नागरिकांना भरोसा कक्ष व ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले. नागरिकांकडून रुग्णालय, गैस, जेवणाचा डबा, औषधे, मोलकरीण व सेवा - सुश्रुषा करणारे महिला व पुरुष यांना येणाऱ्या अडचणी, किराणा, भाजीपाला, पोलिस पास अशा वेगवेगळ्या पद्धतीने १३६ जणांना मदत करण्यात आली.

संचारबंदी सुरू असताना ज्येष्ठांची  गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस शहरातील वेगवेगळ्या भागात काम करणाऱ्या १९० ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाºयांच्या  संपर्कात आहेत. शहरात एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यात येत आहे. 

पोलिसांनी शहरातील ८ ते १० सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहरातील तीन ते साडेतीन हजार ज्येष्ठ नागरिकांना अन्न, पाणी तसेच औषधांचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त 
बच्चन सिंग यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, सहायक फौजदार अडसुळ, शिंदे, कांबळे, चाबुकस्वार, गायकवाड आदी ज्येष्ठ नागरिकांच्या  समस्या सोडविण्यास प्राधान्य देत आहेत.

जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळवण्यासाठी :-  ज्येष्ठ नागरिक कक्ष , हेल्पलाईन क्रमांक १०९० आणि ०२०-२६११११०३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police provided various facilities to the 3500 senior citizens