Coronavirus : पुण्यात मॅार्निंग वॅाक करणाऱ्या ५० नागरिकांवर पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

संचारबंदी काळात अनेकदा विनंती करूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने हडपसर पोलिसांनी कायदयाचा बडगा उगारला आहे. विनाकारण रस्त्यावर येणा-या लोकांना भदंवि १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरवात केली असून गुरुवारी सकाळी मॅार्निंग वॅाक करणाऱ्या ५० नागरिकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

हडपसर (पुणे : संचारबंदी काळात अनेकदा विनंती करूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने हडपसर पोलिसांनी कायदयाचा बडगा उगारला आहे. विनाकारण रस्त्यावर येणा-या लोकांना भदंवि १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरवात केली असून गुरुवारी सकाळी मॅार्निंग वॅाक करणाऱ्या ५० नागरिकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संचारबंदी सुरू झाल्यापासून सुमारे २२५ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच, अनेकांना समज देऊन नोटीसा देखील दिल्या आहेत. तर, नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून ६०५ वाहने जप्त केली आहेत. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रेमश साठे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भावात वाढ होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार, शहरामध्ये संचारबंदी लागू केली आहे.

Coronavirus : धक्कादायक ! जागा नाही म्हणून रस्त्यावर ठेवले 17 मृतदेह

संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता चार पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी आहे. तसेच शहरात विनाकारण फिरण्यास मनाई आहे, असे असतानाही काही जणांकडून त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. अशा विनाकारण फिरणा-यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमाचे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police To Take Action Against People Jogging And Walking