Coronavirus : पुणे विद्यापीठाचा स्तुत्य उपक्रम; ६० हजार विद्यार्थी करणार यंत्रणेला मदत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

  • शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी 'एनएसएस' स्वयंसेवकांची फौज
  • ६० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
  • पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांना देणार आधार

पुणे : 'कोरोना' लाॅकडाऊन काळात नागरिकांना मदत पोहोचविण्यासाठी सरकारी यंत्रणांवर प्रचंड ताण पडत आहे. हा कमी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'राष्ट्रीय सेवा योजने'तील (एन.एस.एस.) पुणे, नाशिक व अहमदनगर ६० हजार विद्यार्थी यंत्रणेला विविध माध्यमातून सहाय्य करणार अाहेत. यासाठी विद्यापीठ स्तरावर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात संचारबंदीमुळे यंत्रणांना विविध कामे करण्यासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. त्यामध्ये 'एनएसएस' स्वयंसेवकांचा उपयोग कसा करून घेता येईल यावर कुलगुरू करमळकर यांनी व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषदेच्या काही सदस्यांशी व 'एनएसएस'च्या अधिकार्यांशी टेलि-कॉन्फरन्सिंगद्वारे साधला. त्यातून हा या उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे; ओएलएक्सवरील जहिरातीने प्रशासन जागे

विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ६० हजार विद्यार्थ्यांची फौज उभी राहणार आहेत. शासकीय यंत्रणेकडून ज्येष्ठ नागरिक, मजूर आदींना जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी वितरणव्यवस्थेला मदत करणे. शासनाकडून विविध वंचित घटकांसाठी बँकांमार्फत निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यासाठी बँकांमध्ये त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची मदत करणे, जे वंचित घटक या लाभांच्या योजनांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हे लाभ त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या कामात मदत करणे, पोलिसांच्या गरजेनुसार पोलीस ठाण्यांमध्ये किंवा त्यांच्या मदत केंद्रात पोलीस मित्र म्हणून काम करणे, यासह महसूल यंत्रणेसोबत काम करणे, या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदानासाठीच्या फिरत्या व्हॅन चालवणे. त्यासाठी यंत्रणांना मदत करणे अशी कामे पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात हे विद्यार्थी करणार आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी मला ताई म्हटले; अन्...; मुलुंडच्या एलिझाबेथ यांनी व्यक्त केला आनंद

या मोहिमेत प्रत्येक एका विद्यार्थ्याला दहा कुटुंब जोडून दिले जाणार आहेत. त्याद्वारे ६ लाख कुटुंब आणि तब्बल २५ लाख लोकांपर्यंत हे विद्यार्थी जोडले जातील. यातून या संचारबंदीच्या काळात घटकांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होऊ शकेल, असा दावा विद्यापीठाने केला आहे. 

सॅनिटायझर व मास्क निर्मिती
विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्क तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याबाबतचे तंत्रज्ञान विद्यापीठाकडून पुरवले जाणार आहे. विद्यार्थी ही उत्पादने तयार करतील आणि ती आरोग्य सेवकांना पुरविण्याची जबाबदारीसुद्धा पार पाडतील.

"कोरोना'च्या आपत्तीशी लढत असताना विद्यापीठाने समाजात जाऊन थेट मदत करणे अपेक्षित आहे. यासाठी ठोस कार्यक्रम घेऊन आम्ही समाजात जात आहोत. यामुळे यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी होईल आणि समाजाला दिलासा मिळेल. - डाॅ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Universities 60,000 student help for Government system in Coronavirus cricis