लायगुडे रुग्णालयात सुधारणा; 'क्वारंटाईन' नागरिकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

लायगुडे रुग्णालयात 'ड्रेनेज तुंबले, जेवणाचे हाल या मथळ्याखाली 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित करून तेथील असुविधा चव्हाट्यावर मांडल्या. क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना अवेळी मिळणारा नाष्टा, दुुपारी व रात्री उशीरा मिळणारे निकृष्ट अन्न यामुळे लहान मुलांचे हाल होत आहेत. तसेच बाथरुम तुंबत असल्याने दुसऱ्याच्या रुममध्ये जाऊन अंघोळ करावी लागत असल्याने सोशल डिस्टंन्सींगला हरताळ फासल्याचे समोर आणले.

पुणे : सिंहगड रस्त्यावरील लायगुडे दवाखान्यातील क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचे जेवणाचे हाल होत होते, तसेच बाथरूम तुंबत होते. हा प्रकार समोर आणल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने जेवणाची व्यवस्था चांगली केली, शिवाय ड्रेनेज स्वच्छता केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लायगुडे रुग्णालयात 'ड्रेनेज तुंबले, जेवणाचे हाल या मथळ्याखाली 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित करून तेथील असुविधा चव्हाट्यावर मांडल्या. क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना अवेळी मिळणारा नाष्टा, दुुपारी व रात्री उशीरा मिळणारे निकृष्ट अन्न यामुळे लहान मुलांचे हाल होत आहेत. तसेच बाथरुम तुंबत असल्याने दुसऱ्याच्या रुममध्ये जाऊन अंघोळ करावी लागत असल्याने सोशल डिस्टंन्सींगला हरताळ फासल्याचे समोर आणले.

laigude hospital food
पुर्वी असे जेवण दिले जात होते

पिंपरीतील पाॅझिटिव्ह संख्या 35; एकाच दिवशी आढळले सहा रुग्ण

नंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने लायगुडे दवाखान्यात ड्रेनेज विभागाची गाडी पाठवून सर्व पाईप स्वच्छ केले. पुर्वी पत्रावळीक कॅरीबॅग मध्ये भाजी व पोळी दिली जात होती. हे आता बंद करून संपूर्ण जेवण दिले जात आहे. आता सकाळी लवकर नाष्टा व दुपारी व रात्री व्यवस्थित ताटामध्ये भाजी, वरण, भात, पोळी दिली जात आहे. याबद्दल क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी 'सकाळ'चे आभार मानले.

laigude hospital food
आता असे जेवण दिले जात आहे

पिंपरीतील पाॅझिटिव्ह संख्या 35; एकाच दिवशी आढळले सहा रुग्ण

"लायगुडे रुग्णालयातील जेवण पुरविणारी एजन्सी बदलून त्या ठिकाणी दुसऱ्याची नियुक्ती केली आहे. व्यवस्थित जेवण करता येईल अशी व्यवस्था केली आहे. तसेच इमारतीतील ड्रेनेज साफ करण्यात आले आहे."
- चेतन कबाडे, क्षेत्रीय अधिकारी, टिळक रस्ता क्षेत्रीय अधिकारी

क्वारंटाईन रुग्णालयात बाथरूम तुंबले, जेवणाचे हाल; उद्देशाला फासला जातोय हरताळ  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine citizens are Comfortable after improvement Laigude Hospital