पुणे - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सॅनिटायझर, मास्कसह इतर सुरक्षाविषयक साधनांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) 'हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरी'कडून (एचईएमआरएल) लष्कराच्या विविध संस्था आणि आस्थापनांना सुमारे एक हजार लिटर हँड सॅनिटायझर व वीस हजार लिटर जंतुनाशक (डिसइन्फेक्टन्ट) पुरविण्यात येत आहे.
यामध्ये पुणे व नगर येथील एआरडीई, आरअँडडीई, ईएमयू, सीडीए, व्हीआरडीई, 12 महाराष्ट्र रेजिमेंट, एएफएमसी सारख्या अस्थापनांचा व संस्थांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशानुसार 'एचईएमआरएल' उच्च दर्जाचे मानके राखून हे सर्व सॅनिटायझर तयार करीत आहे.
याचबरोबर, सामाजिक जबाबदारी म्हणून, पुणे महापालिकेला प्रत्येक आठवड्याला वीस हजार लिटर जंतुनाशक आणि दोनशे लिटर हँड सॅनिटायझर देण्यात येत आहे. त्यामुळे, शहरातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना याचा वापर करता येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.