coronavirus : पोलिस व त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा वा-यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

पोलिस सुपरमॅन आहे का ?
परदेशात पोलिसांना खास गणवेश दिला जात असताना भारतीय पोलिस नेहमीच्या वर्दीवर ही कामगिरी करीत आहे. ड्युटी संपल्यावर ते त्याच ड्रेसवर घरात जात आहे.एखादा विषाणू त्याच्या अंगावर असेल तर घरात लागण होणार आहे. संपुर्ण कुटुंब बाधीत होणार होऊ शकते.साधा रूमाल तोंडाला बांधून पोलिस कर्तव्य बजावत आहे. पोलिस काय सुपरमॅन, शक्तिमान आहे का. असा प्रश्न पोलिस उपस्थित करीत आहे. हातमोजे, सॅनिटायझर, मास्क यांची उपलब्धता पोलिसांना स्वतः करावी लागत आहे. अशा तक्रारी पोलिस करत आहेत.
- रमेश वत्रे

केडगाव, जि. पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांच्या कामाचे कौतुक होत आहे. मात्र पोलिस व त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा वा-यावर असल्याचे चित्र आहे. सरकारने  त्यांच्या सुरक्षितेकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात पोलिसांची संख्या दोन लाखाच्यावर आहे. कर्तव्य बजावत असताना दोन लाख कुटुंबाची सुरक्षा एेरणीवर आहे. पोलिसांच्या कामगिरीवर सतत नाक मुरडणारे आता पोलिसांची वाहवा करत आहेत परंतु त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणी काही बोलत नाही. आरोग्य, वीज, पाणी, किराणा, गॅस, पेट्रोल पंप, रस्ते, रेल्वे, औषधे आदी अत्यावश्यक सेवा आहेत. यातील कोणत्याही विभागाचे काम असले तर नागरिकांचा पहिला फोन पोलिसांनाच असतो. असे पोलिस अधिकारी सांगत आहे.

Fight With Coronavirus : पुणेकरांसाठी मोठी बातमी; गेल्या 48 तासांत कोरोनाचे रुग्ण...

गृहमंत्र्यांनी सांगितले की, पोलिसांनी काठीला तेल लावून कामगिरी करावी. मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत ते काही बोलले नाही.  कोरोनामुळे पोलिसांपेक्षा डॅाक्टर घाबरले आहेत. अत्यावश्यक सेवेच्यानावाखाली पोलिस तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत आहे. कोरोनाच्या भीतीने काही डॅाक्टरांनी त्यांची ओपीडी बंद केली. सरकारने बडगा उगारल्यावर दवाखाने सुरू झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security for police and their families