coronavirus: विद्यार्थी घरात बसून करतात तरी काय

coronavirus: विद्यार्थी घरात बसून करतात तरी काय

पिंपरी - सगळीकडे लॉकडाऊन आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थी घरांमध्ये आहेत. पण, ते घरात बसून करतात तरी काय, या प्रश्नाचे उत्तर शोधल्यावर कळले,‌ ते आपला छंद जोपासताहेत. कलागुण व्यक्त करताहेत. मम्मी, परंपरांचा मोबाईल वापरून वर्ल्ड मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारताहेत. एकमेकांना कोडी घालून बुद्धीला चालना देताहेत. 

'बाहेर खेळायला जावू नका, असं कितीही बजावून सांगितलं तरी मुलं ऐकत नाहीत,' ही बहुतांश पालकांची तक्रार शिक्षकांकडे हमखास असते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात मुले सहसा बाहेर, गल्लीत, चाळीत फारशी खेळताना दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण, मुले त्यांच्या छंदात रमलेली दिसतात. कृष्णानगरच्या तनिष्का जाधवने कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर अतिशय बोलके चित्र काढले आहे. केंद्रीय व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केलेले असतांना अनेक जण विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यांवर भटकतांना दिसतात. अशा व्यक्तींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम तनिष्काने केले आहे. जगाचा नकाशा काढून त्याला साखळी लावून लाॅकडावून दाखविले आहे. आणि हे वास्तव आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जगच लाॅकडावून करावे लागणार. वास्तविकतः ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. 

दुसरीत शिकणारा अथर्व कधी लुडो, तर कधी सापशिडी खेळत असतो. कधी मम्मी, पप्पाला सोबत घेऊन बुद्धीबळाचा पट मांडतो. कधी कधी एकटाच खेळतो. दोन्ही बाजूंच्या सोंगट्या स्वत:च सरकतो. आणि यातूनही बोर झालंच तर, चकरा दोरीवरच्या उठल्या मारतो. 

गंमत कोडी 
एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षिकेने नववीतील विद्यार्थ्यांच्या व्हॉटस्अॅप ग्रूपवर एक कोडे टाकले. ' इंग्रजी शब्दांच्या अर्थाची मुलींची नावे ओळखा,'असे ते कोडे होते. त्यात इंग्रजी शब्द होते, 'लाईन', 'डॉट', 'फ्लॉवर', 'गोल्ड', 'ड्रीम', 'प्रोग्रेस', अशी. तब्बल ३५ शब्द. त्यात अनेक मुलींना बहुतांश नावे ओळखता आली नाहीत. विशेष म्हणजे हे कोडे सोडविण्यात पालक व अन्य शिक्षिकांनीही सहभाग घेतला. कारण, मोबाईल पालकांचा होता. त्यात मुलींची नावे, 'रेखा', 'बिंदू', 'पुष्पा', 'सोना', 'सपना', 'प्रगती' अशी होती. 

त्या बोलल्या, पण 'ऑनलाइन' 
शाळा बंद होऊन जवळपास आठ दिवस झाले. या वेळी त्यांची वार्षिक परीक्षा सुरू होती. दोन-तीन पेपर झाले आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यापूर्वी दोन-तीन दिवस अगोदर पासून 'त्या' जीवलग मैत्रिणी बोलत नव्हत्या. श्रद्धा आणि श्रेया अशी त्यांची नावे. आठवीच्या विद्यार्थ्यांनी. आता शाळा बंदच्या काळात श्रेयाने सुंदर चित्र काढले आणि पप्पांच्या व्हॉटस्अॅप स्टेटसला ठेवले. श्रद्धाने 'नाईस' म्हणत प्रतिसाद दिला. पप्पांनी मोबाईल श्रेयाकडे दिला आणि दोघींचे चॅटिंग सुरू झाले. खूप वेळ. 'तू बोलत का नव्हती' पासून 'बोलशील ना आता, काळजी घे. घराबाहेर पडू नको' इथपर्यंत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com