#Lockdown2.0 : तळेगाव पोलिसांकडून संचारबंदी आणखी कडक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तळेगाव दाभाडे पोलिसांनी संचारबंदीची अंमलबजावणी आणखी कडक केली असून अत्यावश्यक सेवांसह खरेदी विक्रीस दिवसभरात फक्त सकाळी १० ते २ अशी मर्यादा ठेवली आहे.

तळेगाव स्टेशन - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तळेगाव दाभाडे पोलिसांनी संचारबंदीची अंमलबजावणी आणखी कडक केली असून अत्यावश्यक सेवांसह खरेदी विक्रीस दिवसभरात फक्त सकाळी १० ते २ अशी मर्यादा ठेवली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तळेगाव हद्दीतील किराणा व्यावसायिक आणि मेडिकल दुकानदारांची बैठक वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.२०) सकाळी झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानुषंगाने खबरदारी म्हणून रस्त्यावरचा नागरिकांचा वावर रोखण्यासाठी भाजीपाला, दुध, मांसविक्री, बेकरी, गॅस काऊंटर, किराणासह मेडीकल दुकाने ही दिवसभरात एकाच वेळी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत चालू राहतील. नानाविध कारणे शोधून बेफिकीरपणे विनाकारण रस्त्यावर हिंडताना, तसेच दुपारी दोन वाजेनंतर कुणीही रस्त्यावर, सोसायटीत अथवा इतरत्र घराबाहेर फिरताना अथवा विक्री करताना आढळल्यास थेट गुन्हा दाखल करुन पोलिस कडक कारवाई करणार आहेत. आजपर्यंत प्रशासनाने नागरिकांना दिलेले सर्व प्रकारचे पास रद्द करण्यात आले असून, कुठलाही पास ग्राहय धरला जाणार नाही. तसेच वाहने जप्त करण्यात येतील. नागरिकांना काही अडचणी असतील तर फोनवर संपर्क करावा, पोलिस ठाण्यात येऊ नये. कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन वाघमोडे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talegaon police tighten communication barrier