Corona Virus : पुणेकरांनो, गप्प घरात बसा कारण ३१ मार्चपर्यंत...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी वाहतुकीबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, खासगी प्रवासी वाहने, रिक्षा, मोटार (अ‍ॅप आधारित सेवा) तसेच दुचाकीस्वार, हलकी वाहने, जड वाहतूक करणारे ट्रक अशा प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचााऱ्यांना सूट देण्यात आली आहे.

पुणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे पोलिसांतर्फे शहरातील वाहतुकीवर 31 मार्चपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार, शहरामध्ये बेफिकीरपणे फिरणाऱ्या नागरिकांना आता मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून  पुणे पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
Image

पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी वाहतुकीबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, खासगी प्रवासी वाहने, रिक्षा, मोटार (अ‍ॅप आधारित सेवा) तसेच दुचाकीस्वार, हलकी वाहने, जड वाहतूक करणारे ट्रक अशा प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे.

Virus : पुणे - मुंबई प्रवास करणार आहात? थांबा...
दरम्यान, डॉ. शिसवे यांच्या आदेशानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चौकाचौकात पोलिसांकडून बॅरिकेड उभे करुन वाहनचालकांना अडविन्यास सुरुवात झाली. शहरातील जंगली महाराज रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरात पोलिसांनी बॅरिकेड घालून वाहनचालकांना विनाकारण फिरू नका, अशा सूचना दिल्या.
Image

पुणेकरांनो, आता पुर्णवेळ घरातच बसा कारण, पुणे पोलिसांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
वाहनचालकांना मारहाण न करण्याच्या पोलिसांना सूचना -
वाहतूक बंदीबाबत पोलिसांनी दिलेल्या आदेशानंतर वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. पोलिस व नागरिकांमध्ये बाचबाचीचे प्रकारही घडले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनचालकांना मारहाण करु नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. वाहनचालकांचे पोलिसांनी प्रबोधन करावे, असे डॉ.शिसवे यांनी नमूद केले.

महत्वाचे काम असेल तर पोलिसांना सांगा
महत्वाचे काम असेल तर पोलिसांना सांगा. विनाकारण शहरात फिरू नका. कोरोनाचा संसर्गाला अटकाव घालण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport in Pune city banned till March 31 Corona Virus