"कोरोना' इफेक्‍ट ः  सोने बाजारात 300 कोटींची उलाढाल ठप्प !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

गेल्या आठ दिवसांपासून कोरोना व्हायरस मुळे झालेल्या शट डाऊन, संचार बंदीमुळे याचा मोठा आर्थिक फटका जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठेला बसला आहे. 

जळगाव  ः जळगाव जिल्हा सोन्याची नगरी म्हणून ओळखला जातो. जळगावच्या शुद्ध सोने घेण्यासाठी जळगाव जिल्ह्याच नव्हेतर, महाराष्ट्रासह परराज्यातूनही ग्राहक येथे येतात. मात्र "कोरोना'मुळे देशभर लॉकडाऊन आहे. जळगावच्या सोने बाजारपेठेतही बंद आहे. गेल्या आठ दिवसात सोने बाजारात सुमारे तीनशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. 

तर आठ हजार कारागीर बेरोजगार झाले आहे, चार हजार कर्मचारी घरी बसून आहेत. जिल्हा लॉकडाऊनचे चित्र 14 एप्रिलपर्यंत सुरू राहिल्यास सोने बाजारात बाराशे कोटींची उलाढाल ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

"कोरोना' मुळे सर्वच लॉक डाऊन झाले आहे. 22 मार्चच्या रविवारपासून सर्व लॉक डाऊन आहे. या सोन्याच्या नगरी मधील सोन्याच्या दुकानदारांचे आठ दिवसात 300 कोटीचे नुकसान झाले. त्यामुळे सोने चांदीच्या दुकानांवर उपजीविका करणाऱ्या लहान दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील सोने शुद्ध असल्याने जळगावच्या सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाराही महिने सोन्याच्या बाजार पेठेत गर्दी दिसते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून कोरोना व्हायरस मुळे झालेल्या शट डाऊन, संचार बंदीमुळे याचा मोठा आर्थिक फटका जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठेला बसला आहे. 

जळगाव शहराचा विचार केल्यास 175 दुकाने आहेत. जिल्ह्यात 900 सराफाची दुकाने आहे. या दुकानात 8 हजार मजूर सोने चांदीचे दागिने घडविण्याचे कारागीर आहे. या सराफ पेठ्यावर काम करणारे 4 हजार कर्मचारी आहेत. 
शहरात दररोज सुमारे 15 कोटींची उलाढाल होते. जिल्ह्यात दररोज सुमारे 25 ते 30 कोटींची उलाढाल होते. ती सर्व ठप्प झाली. 

जीवन अमूल्य आहे. आपण जगलो तर जीवन जगू. केंद्र, राज्य शासनाने नागरिक जगले पाहिजे यासाठी लॉकडाऊन केले आहे. घराबाहेर कोणीही पडता कामा नये. व्यापार आहे ना उद्या होणार आहे. 
मनोहर पाटील, व्यवस्थापक 
रतनलाल सी बाफना ज्वेलर्स. 

"कोरोना'मुळे सर्व व्यापार बंद आहे. कोरोनो' संसर्ग लागू नये यासाठी लॉकडाऊन आहे. सोने बाजारही बंद आहे. कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. आज ना उद्या सोने बाजार सुरू होईलच. ग्राहकांनी काळजी घ्यावी. 
गौतम लुणिया, अध्यक्ष 
जिल्हा सराफ बाजार असोसिएशन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 300 crore turnover in the gold market stop!