Breaking : बापरे! अकोल्यात एकाच दिवशी आढळले 12 पॉझिटिव्ह रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी एकूण 54 अहवाल प्राप्त झाले.

अकोला : मागील तीन ते चार दिवसांपासून अकोल्यात कोरना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच रविवारी प्राप्त झालेल्या 54 अहवालापैकी तब्बल 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 42 अहवाल निगेटिव्ह आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी एकूण 54 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 42 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एवढ्या मोठ्या संख्येने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेव्हा अकोल्यात समूह संक्रमण मोठ्या प्रमाणात गतिमान झाली असून, यामुळे येत्या काही दिवसांत हे रुग्ण संख्या झपाट्याने वाढणार असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

हेही वाचा - जागतिक हास्य दिन : हसण्याचे आहेत हे फायदे; का साजरा करतात हास्य दिन?...वाचा

रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी दोन महिला या 1 व 2 मे रोजी मयत झाल्या आहेत. त्या बैदपुरा व सिटी कोतवाली परिसरातील रहिवासी होत्या. तर उर्वरित रुग्णांपैकी तिघे मोमीनपुरा, पाच जण बैदपुरा तर दोघे जण न्यू भीमनगर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

आवश्‍यक वाचा - बापरे! या धरणाला लागली गळती; भिंतीलाही गेले तडे...मग कारण बनतील खेकडे

अकोल्यातील कोरोना रुग्णांची सध्यस्थिती

  • एकूण रुग्ण : 52
  • रोगमुक्त होऊन सुटी झालेले : 11
  • मृत्यू : 06
  • आत्महत्या : 01
  • सध्या उपचार सुरू असलेले : 34

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 corona positive patients found in Akola

Tags
टॉपिकस
Topic Tags: