COVID19 : अकोल्याची दीड शतकाकडे वाटचाल; कोरोनाचा ग्राफ वाढतोय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाकडून रविवारी सकाळी 102 अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 96 अहवाल हे निगेटिव्ह आले असून सहा अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहे.

अकोला : एप्रिल महिन्यात दहा ते पंधरा रुग्ण असलेल्या अकोला शहरात मे महिन्यात झपाट्याने वाढ झाली आहे 10 मे पर्यंत अकोल्यात दीडशे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, सद्यस्थितीत 126 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा फुगतच आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाकडून रविवारी सकाळी 102 अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 96 अहवाल हे निगेटिव्ह आले असून सहा अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहे. रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी पाच पुरुष व एक महिला आहेत. हे रुग्ण मोहम्मद अली रोड, रामनगर सिव्हिल लाईन्स, तारफैल भवानी पेठ, दगडीपूल जुने शहर व गवळीपूरा येथील रहिवासी आहेत.

आवश्यक वाचा - हृदयद्रावक : घरी जाण्याचा परवाना मिळाल्याने झाला होता आनंद, मात्र घरी पोहोचण्याआधीच क्षणार्धात बदलला दुःखात

एका महिलेचा मृत्यू
ज्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत त्याच तुलनेत मृत्यूचे प्रमाणही हळूहळू पुढे सरकत आहे. दरम्यान, आज सकाळी एक 50 वर्षीय महिला उपचार घेताना मयत झाली आहे, ही महिला खैर महम्मद प्लॉट येथील रहिवासी होती. ती बुधवार 7 मे रोजी दाखल झाली होती.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-153
मयत-13(12+1), डिस्चार्ज-14
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-126


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 reports came corona positive in Akola district

Tags
टॉपिकस
Topic Tags: