वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य खरेदीसाठी ३.५० कोटीचा निधी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

कोरोना संकटासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरसह ५० लाख रुपयांपर्यंत इतर खर्च आमदार निधीतून करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. परिणामी जिल्ह्यात पाच विधानसभा व दोन विधान परिषदेचे सदस्य (आमदार) असल्याने कोरोना संकटातून सावरण्यासाठी आमदार निधीतून तीन कोटी ५० लाख रुपये खर्च करता येतील.

 

अकोला : कोरोना संकटासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरसह ५० लाख रुपयांपर्यंत इतर खर्च आमदार निधीतून करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. परिणामी जिल्ह्यात पाच विधानसभा व दोन विधान परिषदेचे सदस्य (आमदार) असल्याने कोरोना संकटातून सावरण्यासाठी आमदार निधीतून तीन कोटी ५० लाख रुपये खर्च करता येतील.

जिल्हा प्रशासनासह पोलिस नागरिकांना घराबाहेर पडू नका, घरीच राहा, असे आवाहन करत आहेत.  कोरोना लढ्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सदर उपाययोजना करताना निधीची कमी पडू नये यासाठी आमदार निधीतून ५० लाख रूपये खर्च करण्यासाठी परवानगी राज्य सरकारने दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे व आमदार नितीन देशमुख यांच्यासह विधान परिषद सदस्य (आमदार) गोपीकिशन बाजोरिया व आमदार डॉ. रणजित पाटील यांचा समावेश आहे. संबंधित आमदार त्यांच्या निधीतून कोरोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय यंत्रसामग्री व खरेदी करता येईल.

यावर खर्च करता येणार निधी

  • इनफ्रारेड थर्मामिटर
  • पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स
  • कोरोना टेस्टिंग किट्स
  • आयसीयु व्हेंटीलेटर व आयसोलेशन/क्वॉरंटाईन वार्डस व्यवस्था
  • आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी फेस मास्क, ग्लोस व सॅनिटायझर
  •  कोरोना विषाणूच्या उपाययोजनांसाठी प्रमाणित केलेली वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य

आमदार शर्मांनी दिला २५ लाखांचा निधी
शासकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात सध्या काेराेना विषाणू संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून होणे आवश्‍यक आहे. यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपल्या आमदार निधी अंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3.50 crore for the purchase of medical equipment and materials at Akola!