पुन्हा दोन मृत्यू, अकोला येथे तीन महिलांसह पाच पुरुष आढळले पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

अकोल्यात शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या एकूण 92 अहवालापैकी आठ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर उर्वरित 84 अहवाल निगेटिव्ह आले आहेत शुक्रवारी आढळलेल्या आठ रुग्णांमध्ये तीन महिलांसह पाच पुरुषांचा समावेश आहे विशेष म्हणजे शुक्रवारी सकाळी पुन्हा दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अकोला  : अकोल्यात शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या एकूण 92 अहवालापैकी आठ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर उर्वरित 84 अहवाल निगेटिव्ह आले आहेत शुक्रवारी आढळलेल्या आठ रुग्णांमध्ये तीन महिलांसह पाच पुरुषांचा समावेश आहे विशेष म्हणजे शुक्रवारी सकाळी पुन्हा दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दोन रुग्ण मयत झाले आहेत. हे दोन्ही रुग्ण हे १९ मे रोजी दाखल झाले होते. ते त्याच दिवशी मयत झाले. त्यांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील एक रुग्ण ५० वर्षीय महिला असून, ती नायगाव येथील रहिवासी आहे. तर अन्य एक ५२ वर्षीय पुरुष असून तो बाळापूर रोड अकोला येथील रहिवासी आहे.

15 जणांना डिस्चार्ज
तसेच 21 मे रोजी रात्री १५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यातील पाच जणांना घरी तर दहा जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवले आहे.

शुक्रवारी असे आढळले रुग्ण
शुक्रवारी सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात तीन महिला व पाच पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी दोघे  फिरदौस कॉलनी तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर,  गोकुळ कॉलनी  येथील रहिवासी आहेत.
पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून  ती वर्धा येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जि.प. शाळेतील अलगीकरण कक्षातच होती.

सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३४९
मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२०६
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again two deaths, five men including three women found positive in Akola