Coronavirus : अकोल्यात दोन रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह; उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 129 वर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
 

अकोला : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सुद्धा कोरोनाची दहशत वाढत चालली आहे. महानगर, शहरानंतर ग्रामीण भागात पोहोचलेल्या कोरोना संसर्गाचे दोन रुग्ण सोमवारी (ता. 11) नव्याने पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 156 झाली असून ॲक्टिव रुग्णसंख्या 229 झाली आहे.

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोमवारी (ता. 11) सकाळी 10 वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे 43 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 41 अहवाल निगेटिव्ह आले असून दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 156 झाली असून 129 रुग्ण हे सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत.

आवश्यक वाचा - चिंताजनक : या जिल्ह्याच्या कोरोनामुक्तीच्या आनंदावर काही तासातच विरजन

मोठी उमरी व जुने शहरात आढळले रुग्ण
सोमवारी (ता. 11) सकाळी प्राप्त 43 पैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. सदर पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा सहभाग असून ते मोठी उमरी परिसरातील रहिवासी आहेत तर दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा जुने शहरातील किल्ला चौक परिसरातील रहिवासी आहे. त्यामुळे नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला भाग सील करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -  156
मृत - 13 (1 आत्महत्या)
अॅक्टिव्ह रुग्ण - 129


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: again two patient corona positive in akola