कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील बंद दुकानातून माल बाहेर काढणे सुरू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

शहरातील दोन्ही आमदारांनी व्यापाऱ्यांच्या भावना जाणून घेत व्यावसायिकांना प्रतिबंधित क्षेत्रातून त्यांचा माल काढण्याची मूभा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस माल काढण्यासाठी दोन वेळेत सुट देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी काही दुकानदारांनी त्यांचा माल काढण्यास सुरुवात केली.

अकोला : शहरातील दोन्ही आमदारांनी व्यापाऱ्यांच्या भावना जाणून घेत व्यावसायिकांना प्रतिबंधित क्षेत्रातून त्यांचा माल काढण्याची मूभा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस माल काढण्यासाठी दोन वेळेत सुट देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी काही दुकानदारांनी त्यांचा माल काढण्यास सुरुवात केली.

ही सुट मिळाल्याने अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान टळले आहे. लॉकडाउनमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या व्यापाऱ्यांचे या निर्णयाने मोठे आर्थिक नुकसान टळण्यास मदत होणार आहे.

अकोला शहरात बैदपुरा परिसरात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढला होता. त्यामुळे या परिसरात येणारे प्रमुख बाजार एका दिवसात बंद करण्यात आले. यात सरफा बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार व जनता भाजीबाजाराचा समावेश होता. त्यानंतर सिव्हिल लाईऩ्स ते जवाहनगर रोडवरील जीएमडी मार्केटही प्रतिबंधित क्षेत्र झाले. येथे असलेल्या व्यापाऱ्यांचा कोट्यवधीचा माल दुकानातच अडकून पडला. दीड महिन्यापासून माल अडकला असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शिवाय माल खराब होण्याची शक्यताही वाढली. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा माल काढण्याची मुभा देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती. त्यानुसार आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांनी आधी जिल्हा प्रशासनाकडे व त्यानंतर पालकमंत्री बच्चू यांच्याकडे हा विषय मांडला. गुरुवारी पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवा आणि शनिवार असे दोन दिवस सकाळी 8 ते दुपारी 12 व दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत माल काढण्याची वेळ देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी किराणा बाजारातील व्यापाऱ्यांनी त्यांचा माल सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत काढला. कोठडी बाजारातील व्यापाऱ्यांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत माल काढला. जीएमडी मार्केटमध्ये सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत व्यापाऱ्यांना त्यांचा माल काढता आला.

आजही सुट
व्यापाऱ्यांना त्यांचा माल काढण्यासाठी शनिवारीही सुट देण्यात आली आहे. त्यानुसार जुना भाजी बाजारातील व्यापाऱ्यांना सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दाणा बाजारातील दुपारी 12 ते चार या वेळेत व्यापाऱ्यांना त्यांचा माल काढता येणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील बंद दुकानातून माल बाहेर काढणे सुरू

व्यापाऱ्यांना दिलासा, लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टळणार

 

अकोला : शहरातील दोन्ही आमदारांनी व्यापाऱ्यांच्या भावना जाणून घेत व्यावसायिकांना प्रतिबंधित क्षेत्रातून त्यांचा माल काढण्याची मूभा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस माल काढण्यासाठी दोन वेळेत सुट देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी काही दुकानदारांनी त्यांचा माल काढण्यास सुरुवात केली. ही सुट मिळाल्याने अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान टळले आहे. लॉकडाउनमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या व्यापाऱ्यांचे या निर्णयाने मोठे आर्थिक नुकसान टळण्यास मदत होणार आहे.

अकोला शहरात बैदपुरा परिसरात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढला होता. त्यामुळे या परिसरात येणारे प्रमुख बाजार एका दिवसात बंद करण्यात आले. यात सरफा बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार व जनता भाजीबाजाराचा समावेश होता. त्यानंतर सिव्हिल लाईऩ्स ते जवाहनगर रोडवरील जीएमडी मार्केटही प्रतिबंधित क्षेत्र झाले.

येथे असलेल्या व्यापाऱ्यांचा कोट्यवधीचा माल दुकानातच अडकून पडला. दीड महिन्यापासून माल अडकला असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शिवाय माल खराब होण्याची शक्यताही वाढली. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा माल काढण्याची मुभा देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती. त्यानुसार आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांनी आधी जिल्हा प्रशासनाकडे व त्यानंतर पालकमंत्री बच्चू यांच्याकडे हा विषय मांडला.

गुरुवारी पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवा आणि शनिवार असे दोन दिवस सकाळी 8 ते दुपारी 12 व दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत माल काढण्याची वेळ देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी किराणा बाजारातील व्यापाऱ्यांनी त्यांचा माल सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत काढला. कोठडी बाजारातील व्यापाऱ्यांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत माल काढला. जीएमडी मार्केटमध्ये सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत व्यापाऱ्यांना त्यांचा माल काढता आला.

आजही सुट
व्यापाऱ्यांना त्यांचा माल काढण्यासाठी शनिवारीही सुट देण्यात आली आहे. त्यानुसार जुना भाजी बाजारातील व्यापाऱ्यांना सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दाणा बाजारातील दुपारी 12 ते चार या वेळेत व्यापाऱ्यांना त्यांचा माल काढता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akoal Corona continues to unload goods from closed shops in restricted areas