कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांने मारले गळ्यावर ब्लेड

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाने गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान उघडकीस आला या रुग्णाची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

 

अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाने गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान उघडकीस आला या रुग्णाची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील  आयसोलेशन कक्षात सध्या एकूण 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे यामध्ये अकोल्यातील सहा तर पातूर मधील सात रुग्णांचा समावेश आहे या पातूरमधील सात रुग्णांपैकी एकाने शनिवारी सकाळी गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आत्महत्या करणाऱ्या त्या रुग्णाची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहितीही समोर येत असून सिटी कोतवाली पोलीस यासंदर्भात पुढील कारवाई करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Corona patient attempts suicide