अबब! बारा दिवसात आढळले 194 कोरोना बाधित, सोबत आठ मृत्यू, मे महिना ठरतोय कोरोना उद्रेकाचा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

अकोल्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्ण आढळण्याची गती मेमध्ये अधिक वाढली आहे. 10 ते 21 मे या दरम्यान अकोल्यात 194 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, या गती बरोबरच आठ जणांचा मृत्यू झाला असून,ही आकडेवारी अकोलेकरांची झोप उडविणारी अशीच आहे.
 

अकोला  ः अकोल्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्ण आढळण्याची गती मेमध्ये अधिक वाढली आहे. 10 ते 21 मे या दरम्यान अकोल्यात 194 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, या गती बरोबरच आठ जणांचा मृत्यू झाला असून,ही आकडेवारी अकोलेकरांची झोप उडविणारी अशीच आहे.
अकोल्यात 7 एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला

होता. 24 एप्रिलपर्यंत ही संख्या काहीशीच होती. मात्र, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून अकोल्यात कोरोना बाधित रुग्ण आढळण्याची गती वाढली सोबतच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आतापर्यंत एका आत्महत्येसह 21 जण मृत्यूमुखी पडली असून, ही बाब अकोलेकरांसाठी चिंता वाढविणारी अशीच आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात झपाट्याने वाढ
आरोग्य विभाग अद्यापही अकोल्यात समुह संक्रमण सुरू झाले नसल्याचे नाकारत आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांत ऐवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने शहरातील महत्वाचे भाग सध्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola 194 corona infections found in two days, along with eight deaths, corona outbreak in 12 days in May