अबब! एका महिन्यात 28, दहा दिवसात 100 रुग्ण, अकोल्यात कोरोनाचा मे महिन्यात वाढतायेत पटीने रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

अकोला शहर आणि जिल्ह्यात एप्रिल महिन्यात केवळ २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. मात्र मे लागतात या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अवघ्या दहा दिवसात शंभरच्यावर नवे रुग्ण पॉझिटिव वाढले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

अकोला  : अकोला शहर आणि जिल्ह्यात एप्रिल महिन्यात केवळ २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. मात्र मे लागतात या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अवघ्या दहा दिवसात शंभरच्यावर नवे रुग्ण पॉझिटिव वाढले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोना विषाणू बेरीज नव्हे तर गुन्हा करत करतो असे वारंवार सांगण्यात आलेले आहे त्यामुळेच टाळेबंदी दिवसेंदिवस वाढवली जात आहे. आधी मुंबई पुण्यामध्ये गुणाकाराचे चित्र आपण प्रसारमाध्यमातून पाहण्याचा असेल त्या नंतर ते हळूहळू विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि अमरावती शहरात पहिले. आता त्याचाच प्रत्यय अकोलेकरांना मे महिन्यात येताना दिसून येत आहे. कारण एप्रिल महिन्याच्या तीस दिवसात केवळ २८ रुग्ण आढळलेल्या अकोला शहरात मे महिन्यात अवघ्या दहा दिवसात तब्बल शंभरच्यावर रुग्ण आढळल्याने खऱ्या अर्थाने कोरोनाने मे महिन्यातच अकोल्यात गुणाकार करण्यास सुरुवात केली आहे.

अद्यापही समूह संसर्ग कसा नाही?
वैद्यकीय क्षेत्रातील काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता अद्याप तरी अकोला शहरात समूह संसाराला सुरुवात झाली नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असतील तर हा समूह संसर्ग कसा नाही हे न करणारे कोडे आहे, असे जरी असले तरी दिवसागणिक रोज नवे क्षेत्र कोरोना व्यापत आहे.

असे आढळले रुग्ण
सात एप्रिल रोजी अकोल्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत ही संख्या २८ वर जाऊन पोहोचली होती. यामध्ये काही मृत्यू तर काही जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता; मात्र १ते १० मेपर्यंत तब्बल १०९ रुग्ण आढळले असल्याने अकोल्यात रुग्णांची संख्या गुणाकारांने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola 28 patients in a month, 100 patients in ten days, corona in Akola increasing in multiples in May