esakal | कोरोनात जगण्यासाठी लढाई; दहा हजार चर्मकार गटाई कामगार बेरोजगार, सामाजिक न्याय विभागाकडून न्यायाची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola battle for survival in Corona; Tens of thousands of leather workers unemployed, waiting for justice from the Department of Social Justice

कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हातावरचे व्यवसायिक, मजूर व कामगांराना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. त्यात चर्मकार गटाई कामगारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील १० हजारांवर कामगारांच्या हात सध्या बेरोजगार झाले आहे.

कोरोनात जगण्यासाठी लढाई; दहा हजार चर्मकार गटाई कामगार बेरोजगार, सामाजिक न्याय विभागाकडून न्यायाची प्रतीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हातावरचे व्यवसायिक, मजूर व कामगांराना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. त्यात चर्मकार गटाई कामगारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील १० हजारांवर कामगारांच्या हात सध्या बेरोजगार झाले आहे.

त्यांचा रोजच्या जगण्यासाठी लढा सुरू आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे दलितांसाठी स्वतंत्र बजेट आहे. त्यातून मदत करीत या कामगारांना न्याय देण्याची मागणी आता पुढे येत आहे.


हातावरच्या गटाई व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि कामगारांचे गेले दोन महिन्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दररोज कमावणे व प्रपंच चालविणाऱ्या हातांना कामच नसल्याने उपासमारीची वेळ या कामगारांवर छोट्या व्यावसायिकांवर आली आहे. राज्यभरात गटाई कामगारांची संख्या दीड ते दोन लाख आहेत. पाच ते दहा टक्के चप्पल बुटाचे मोठे, मध्यम शोरूम दुकाने सोडले तर उर्वरित सर्व घटक हलाखीचे जीवन जगतात. अकोला जिल्ह्यात ८ ते १० हजारांहून अधिक गटाई व्यावसायिक, छोटे, मध्यम दुकानदार आहेत. संचारबंदीमुळे या सर्वच घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

चर्मकार महासंघाची मदत
राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि समाजातील आर्थिक परिस्थिती मजबुत असणाऱ्या समाज बांधवांकडून गोरगरीब व्यावसायिकांना गेल्या वीस ते पंचविस दिवसांपासून राज्यात अन्नदान, धान्य व जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात येत आहे. या घटकांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे दोन ते तीन वेळा पाठपुरावा केला आहे. याबाबत शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

व्यावसायाची परवानगी द्यावी
चर्मकार समाज व्यावसायिकांना व्यवसायासाठी परवानगी द्यावी. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमाचे पालन करून शासनास सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

चर्मकार समाजात गटाई कामगारांबरोबरच इतर व्यवसाय करणाऱ्या हातावरील समाजबांधवांची मोठी संख्या आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या नेत्तुत्वात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मदतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातून दलितांच्या विकासासाठी स्वतंत्र बजेटमधून लवकर मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.
- गजानन भटकर , विदर्भ प्रमुख, राष्ट्रिय चर्मकार महासंघ

कोरोनाच्या संकटात चर्मकार समाजातील समाजबांधव खासकरून गटाई कामगार हे बिकट परिस्थीतीचा सामना करत आहे. लॉकडाउन वाढल्यामुळे येणारा काळ खुपच गठीण जाणार आहे. समाजातील दानशुर व्यक्तीनी समोर येण्याची गरज आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशासनाचे सर्व नियम पाळू आणि सहकार्य करू.
- राम उंबरकर, प. विदर्भ प्रमुख, युवा राष्ट्रीय चर्मकार महासंघ