लवकरच भोपाळला रवाना होणार दुसरी श्रमीक रेल्वे, मध्यप्रदेशातील कामगारांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

पश्चिम विदर्भात लॉकडाउनमध्ये अडकलेले मध्यप्रदेशातील मजूर घेवून अकोल्यातून लवकरच दुसरी श्रमीक रेल्वे रवाना होणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील 1192 मजुरांना अकोला-लखनऊ या पहिल्या श्रमीक रेल्वेने पाठविण्यात आले होते. 
 

 

अकोला : पश्चिम विदर्भात लॉकडाउनमध्ये अडकलेले मध्यप्रदेशातील मजूर घेवून अकोल्यातून लवकरच दुसरी श्रमीक रेल्वे रवाना होणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील 1192 मजुरांना अकोला-लखनऊ या पहिल्या श्रमीक रेल्वेने पाठविण्यात आले होते. 
अमरावती विभागात परराज्यातील मजूर मोठ्याप्रमाणावर कामाला आहेत. एमआयडीसी आणि विविध ठिकाणी काम करणारे हे कामगार गेले दीड महिन्यापासून लॉकडाउनमध्ये अडकले होते. त्यांपैकी उत्तर प्रदेशातील 1192 कामगार व मजुरांना घेवून अकोला येथून पहिली श्रमीम रेल्वे लखनऊकरीत 4 मे रोजी रवाना करण्यात आली होती. 

मध्यप्रदेश येथील कामगार व मजूरसुद्धा या भागात मोठ्याप्रमाणावर आहेत. त्यांनाही अकोला येथून दुसऱ्या श्रमीम रेल्वे भोपाळ येथे पाठविण्याची तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी उत्तर प्रदेशनंतर मध्यप्रदेशातील कामगार व मजूर वर्गासाठी अकोला येथून श्रमीक रेल्वे पाठविण्याबाबत रेल्वे प्रशासनाला सूचना केल्या होत्या. केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे हे भुसावळ रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या सूचनेनुसार रेल्वे प्रशासनाने दुसरी श्रमीक रेल्वे अकोला येथून सोडण्याची तयारी केली आहे. 

सर्वोपचारमध्ये कामगारांची तपासणी 
मध्यप्रदेशातील कामगारांना दुसऱ्या श्रमीक रेल्वेने भोपाळ येथे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावती विभागातील विविध जिल्ह्यातील कामगारांनी त्यांच्या जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे. अकोला जिल्ह्यातील कामगारांची आरोग्य तपासणी बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी रुग्णालयात कामगारांची एकच गर्दी झाली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola to Bhopal train for labour in lockdown, before madhya pradesh one train provided for uttar pradesh