... या जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या सीमा बंद, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

कोरोना विषाणू प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. तथापि वाढता प्रादुर्भाव पाहता संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या सिमा बंद करणाचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

अकोला ता. ७ : कोरोना विषाणू प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. तथापि वाढता प्रादुर्भाव पाहता संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या सिमा बंद करणाचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, अंतर्गत मार्गांवरील तालुक्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

अत्यावश्यक सेवा व परवानगीधारक वाहने वगळता अन्य वाहतूक बंद राहिल. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्ती एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात अथवा गावात प्रवेश करणार नाही. एका हद्दीतून दुसऱ्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची नोंद घेतली जाईल. या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, त्यासाठी आवश्यक चेकपोस्ट व आवश्यक पथकांची नियुक्ती करावी, असे आदेशात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Boundaries of all seven talukas in Akola district closed