नियोजना अभावी वाढतायेत कोरोना संक्रमीत रुग्ण, नगरसेवक राजेश मिश्रा यांचा प्रशासनावर आरोप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अकोल्यात दिवसेंंदिवस वाढतच आहे. नियोजन नसल्याने संसर्ग वाढत आहे. हॉटस्पॉट क्षेत्रात प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे अकोला शहरावर हे संकट ओढवत असल्याचा आरोप शिवसेवा नगरसेवक राजेश मिश्रा यांनी केला आहे.

अकोला :  कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अकोल्यात दिवसेंंदिवस वाढतच आहे. नियोजन नसल्याने संसर्ग वाढत आहे. हॉटस्पॉट क्षेत्रात प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे अकोला शहरावर हे संकट ओढवत असल्याचा आरोप शिवसेवा नगरसेवक राजेश मिश्रा यांनी केला आहे.

त्यांनी नागरिकांना संयम बाळगून स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सांभळण्याचे आवाहनही नागरिकांना केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी वावरताना कितीही दक्षता घेतली तरी कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता राहते. त्यामुळे नागरिकांनी खूपच अत्यावश्‍यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन नगरसेवक राजेश मिश्रा यांनी केले. कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने केला. चांगले काम करताना काही संकटे येतच असताता. त्यामुळे घाबरून जाण्याचे काम नाही. संसर्गातून होणारा हा आजार आहे. संयम ठेवला तर त्यातून लवकरच बाहेर पडता येते.

त्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे थांबवावे. भाजीपाला, दूध-दही खरेदी करताना काळजी घ्यावी. अत्यावश्‍यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन मिश्रा यांनी केले. प्रशासनाच्या नियोजनावरही त्यांनी ताशेरे ओढले. एखाद्याची चाचणी केल्यानंतर तीन-चार दिवस अहवाल येत नाही. तोपर्यंत संबंधितांना संस्थात्मक क्वारंटाईन करणे गरजेचे असताना त्यांना घरी पाठवले जाते. या काळात कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याची लागण होते. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे मिश्रा म्हणाले. नियोजनाचा अभाव व प्रतिबंधित क्षेत्रात प्रशासनाचे नियोजन नसल्याने संकट वाढले आहे. कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद असले तरी त्यात नियोजनाचा अभाव असल्याने प्रशासनाला कठोर भूमिका घेवून नियंत्रण करावे लागणार असल्याचे मिश्रा म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Corona-infected patients on the rise due to lack of planning, Corporator Rajesh Mishra accuses the administration